Netflix, Amazon Prime Video, Hotstar या OTT प्लॅटफॉर्मसह ऑनलाईन न्यूज पोर्टल वर आता केंद्रीय प्रसारण खात्याची असणार करडी नजर
कारण चित्रपटांमध्ये ज्या गोष्टीला सेन्सॉरची खात्री बसते त्याच गोष्टी सर्रासपणे OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जातात. यामुळे सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सध्या संपूर्ण जग हे डिजिटलमय झाले असून ऑनलाईन प्लॅटफॉर्म (Online Platform) आणि ऑनलाईन पोर्टल (Online Portal) सध्या तेजीत आहेत. लोकांना घराबाहेर हवे तसे फिरता येत नसल्याने लोक घरी बसून OTT प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून स्वत:चे मनोरंजन करतात. मात्र यामुळे कधी कधी ऑनलाईन कंटेटवर काही अश्लील गोष्टी दाखवली जात आहेत. तर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून कधीकधी माध्यमांना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होते. यामुळे आता आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Over-the-top Platform) केंद्राच्या माहिती-प्रसारण खात्याची नजर असणार आहे. तसेच ऑडिओ व्हिजवल आणि चालू घडामोंडीवर भाष्य करणाऱ्या आणि बातम्या देणाऱ्या वेबसाईटवर देखील सरकारची करडी नजर असणार आहे.
NetFlix, Amazon Prime, Hotstar यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मसह ऑनलाईन न्यूज पोर्टलवर आता केंद्रीय माहिती प्रसारण लक्ष ठेवणार आहे. कारण चित्रपटांमध्ये ज्या गोष्टीला सेन्सॉरची खात्री बसते त्याच गोष्टी सर्रासपणे OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जातात. यामुळे सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
एवढेच नव्हे जे चालू घडामोंडीवर भाष्य आणि बातम्य देणाऱ्या वेबसाईटवरील कंटेन्ट देखील केंद्रीय माहिती प्रसारण खात्याच्या अखत्यारित्या असणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्यात वकिली केली होती की, ‘ऑनलाईन मीडियाचे नियमन टीव्ही पेक्षा देखील जास्त महत्त्वाचे आहे.’ आता सरकारने ऑनलाईन मीडियाद्वारे न्यूट कंटेन्ट देणाऱ्या मीडियाला मंत्रालया अंतर्गत आणण्याची पाऊल उचलले आहे.