Fact Check: 'प्रधानमंत्री मोफत स्कूटी योजने'अंतर्गत सरकार विद्यार्थिनींना देत आहे मोफत स्कूटी? काय आहे व्हायरल दाव्यामागील सत्य? जाणून घ्या

या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री मोफत स्कूटी योजना' (Pradhan Mantri Free Scooty Scheme) अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देत ​​आहे. तथापि, जेव्हा या दाव्याची चौकशी केली गेली तेव्हा सत्य काहीतरी वेगळेच आढळले.

Fact Check: 'प्रधानमंत्री मोफत स्कूटी योजने'अंतर्गत सरकार विद्यार्थिनींना देत आहे मोफत स्कूटी? काय आहे व्हायरल दाव्यामागील सत्य? जाणून घ्या
Pradhan Mantri Free Scooty Scheme viral claim (फोटो सौजन्य - X/PIB)

Fact Check: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज किंवा फोटो व्हायरल होत असतात. यापैकी अनेक फोटो किंवा दावे खोटे तसेच किंवा दिशाभूल करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाचं एक दावा प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री मोफत स्कूटी योजना' (Pradhan Mantri Free Scooty Scheme) अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देत ​​आहे. तथापि, जेव्हा या दाव्याची चौकशी केली गेली तेव्हा सत्य काहीतरी वेगळेच आढळले.

काय आहे व्हायरल दावा?

सोशल मीडियावरील एका लेखात असा दावा केला जात आहे की, सरकार 'प्रधानमंत्री मोफत स्कूटी योजना' अंतर्गत विद्यार्थिनींना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत स्कूटी देत ​​आहे. व्हायरल लेखाचे शीर्षक आहे, 'पीएम मोफत स्कूटी योजना: मुलींना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत स्कूटी मिळते, अशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करा.' हा मेसेज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

प्रधानमंत्री मोफत स्कूटी योजना व्हायरल मसेज - 

काय आहे व्हायरल दाव्यामागील सत्य?

दरम्यान, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या लेखाच्या दाव्याची तथ्य तपासणी केली. PIB ने केलेल्या तथ्य तपासणीत हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून आले. PIB ला तथ्य तपासणीत असे आढळून आले की केंद्र सरकारकडून अशी कोणतीही 'मोफत स्कूटी योजना' चालवली जात नाही. केंद्र सरकारशी संबंधित अचूक आणि प्रामाणिक माहितीसाठी, फक्त संबंधित मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून लोकांना नेहमीच सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, लोकांना अशी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पुढे शेअर करू नये, असं आवाहनही सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत असते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2025 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).