TCS कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; कंपनीने केली Salary Hike ची घोषणा, 6 महिन्यांत दुसऱ्यांदा केली पगारवाढ

मागील वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये जेव्हा टीसीएसने आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही त्यावेळीही हे काम करणारी ही देशातील पहिली आयटी कंपनी होती

File image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ जाहीर केली आहे. यावर्षी हा निर्णय घेणारी ही देशातील पहिली आयटी कंपनी आहे. या निर्णयाचा फायदा कंपनीतील 4.7 लाख कर्मचार्‍यांना होईल. मिळालेल्या माहितीनुसार, ऑफशोर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 6-7 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सहा महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा टीसीएसने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसच्या प्रवक्त्याने वेतनवाढीच्या निर्णयाची पुष्टी केली आणि सांगितले की कंपनीच्या बेंचमार्कनुसार जगभरातील टीसीएस कर्मचार्‍यांना त्याचा फायदा होईल. टीसीएसच्या प्रवक्त्याने 19 मार्च रोजी सांगितले की, ही वेतनवाढ एप्रिल 2021 पासून लागू होईल.

स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2021-22 आर्थिक वर्षापासून टीसीएस कामगारांना सहा महिन्यांच्या कालावधीत सरासरी 12 ते 14 टक्के वेतनवाढ मिळेल. मागील वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये जेव्हा टीसीएसने आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही त्यावेळीही हे काम करणारी ही देशातील पहिली आयटी कंपनी होती. स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना साथीच्या रोगामुळे अनिश्चितता पसरली असूनही, कंपनीने आपल्या कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय उद्योगाच्या निकषांनुसार घेतला होता.

याशिवाय टीसीएस आपल्या कर्मचार्‍यांना नियमितपणे बढतीही देत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत, टीसीएसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या महसुलात झालेली वाढ ही मागील 9 वर्षातील सर्वाधिक होती. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टीसीएसची स्थिर चलनाच्या कालावधीत महसूल वाढ तिमाही आधारावर 4.1 टक्के होती. आर्थिक वर्ष 2011 च्या तिसर्‍या तिमाहीनंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. (हेही वाचा: कोरोना विषाणू महामारीने 7.5 कोटी भारतीयांना गरिबीमध्ये ढकलले; Pew Research Center च्या अहवालातून खुलासा)

दरम्यान, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक यांनी ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केली होती. कॉग्निझंटने 24 हजार 1.6 लाख कर्मचार्‍यांच्या कामगिरीच्या आधारे जागतिक स्तरावर 24 हजार कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली आणि वेतनवाढ केली. एक्सेंचरने कर्मचार्‍यांना 18 मार्च रोजी बोनस जाहीर केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif