LPG Cylinder Price: गॅस सिलिंडर झाला स्वस्त; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 39.50 रुपयांनी कपात केल्यानंतर आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅसचा सिलिंडर 1757 रुपयांना मिळणार असून यापूर्वी या सिलिंडरची किंमत 1796.50 रुपये इतकी होती.
देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी शुक्रवारी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात कपात केली आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस मोठा दिलासा मिळाला. मात्र, हा दिलासा सर्वसामान्यांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला. फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinder) दरातच कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर 39.50 रुपयांनी स्वस्त झाला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Price Hike: गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले; जाणून घ्या मुंबई ते कोलकत्ता शहरातील आजपासून चे नवे दर)
गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 39.50 रुपयांनी कपात केल्यानंतर आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅसचा सिलिंडर 1757 रुपयांना मिळणार असून यापूर्वी या सिलिंडरची किंमत 1796.50 रुपये इतकी होती. कोलकात्यात 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1 हजार 868.50 इतकी झाली आहे आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1 हजार 710 रुपयांना मिळणार आहे. तर, चेन्नईमध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1 हजार 929 रुपयांना विकले जाणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902.5 रुपये आहे. तर दिल्लीत घरगुती सिलिंडर 903 रुपये, पश्चिम बंगाल 929 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे