Gold Rate Today: सोनं महागलं, सराफा बाजारातील आजचे दर 41 हजारांच्या पार

त्यामुळे गुंतवणूकदार एका सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यास पसंत करत आहेत. आंतरराष्ट्रीय असो वा लोकल बाजारात सोन्याचे दर वाढत चालले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गुंतवणूकदार एका सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यास पसंत करत आहेत. आंतरराष्ट्रीय असो वा लोकल बाजारात सोन्याचे दर वाढत चालले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केट मध्ये सोन्याच्या दरांनी गेल्या काही रेकॉर्ड मोडला आहे. त्याचसोबत MCX येथे सुद्धा सोन्याचे दर वेगाने वाढत असल्याचे दिसून आले.

अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे कमांडर कासिम सुलेमान याला मारण्यात आले. त्यानंतर अमेरिकेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन किंवा अन्य माध्यमातून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे गुंतणूकदारांमध्ये गुंतणूकीबाबत निश्चितता नाही आहे. गुंतवणूकदार सध्या शेअर मार्केट मधून नफा मिळणवण्यासाठी सोने हे सुरक्षित पर्याय मानत त्यावर पैसे लावत आहेत. त्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर 41 हजारांच्या पार गेल्याचे दिसून आले आहे. आजचा सोन्याचा दर 41,135 रुपये प्रति 10 ग्रॅम (24कॅरेट) आहे. सोन्यासोबत चांदीचे दर सुद्धा वाढले आहेत. आज चांदीचे दर 1 किलोसाठी 51042.00 रुपये झाला आहे. भारतात चांदीची खुप मागणी असून ज्वेलरी बनवण्यासाठी उपयोग केला जातो.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)

सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतीमहागाईचा नाही म्हटले तरी सराफाबाजारातील व्यवहारावर परीणाम झालेला पाहायला मिळते.