Gold Rate On Diwali Padwa 2020: दिवाळी पाडव्या दिवशी काय आहे सोनं, चांदीचा दर? पहा प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव

साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हा दिवस सोने, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे सोन्याची नाणी, वळं, बिस्कीटं, दागिने खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडेल.

Gold Rate (photo Credits: PTI)

Gold Rate Today: आज दिवाळी पाडवा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हा दिवस सोने, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे सोन्याची नाणी, वळं, बिस्कीटं, दागिने खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडेल. दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असल्याने या काळात म्हणजे अगदी धनतेरसपासून पाडव्यापर्यंत सोने खरेदी, वस्तू खरेदीला लोक भरभरुन पसंती देतात. त्याचबरोबर आज पाडवा असल्याने नववर्ष आणि पत्नीला ओवाळणीत देण्यासाठी एखादा दागिना यानिमित्ताने देखील खरेदी केली जाईल. तर पाडव्या निमित्त आजचा सोन्याचा दर काय आहे? जाणून घेऊया... (Paytm, GooglePay आणि Broker Firms च्या माध्यमातून कशी कराल डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या)

दिवाळी सुरु झाल्यापासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मी पूजना दिवशी देखील सोन्याचे भाव वधारले होते. यापूर्वी कोरोना व्हायरस संकटकाळात सोन्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली.

आजचा सोन्याचा दर:

शहर

24 करेट/प्रतितोळा

22 करेट/प्रतितोळा

मुंबई 50,919 रुपये

49,959 रुपये

पुणे

51,015 रुपये

48,635 रुपये

नाशिक

51,034 रुपये

48,614 रुपये

नागपूर

51,065 रुपये

48,575 रुपये

सोलापूर

51,056 रुपये

48,596 रुपये

कोल्हापूर

51,067 रुपये

48,617 रुपये

(वरील सोन्याचा दर  goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आला आहे.)

आपल्याकडे सोन्यासोबतच चांदी खरेदीवर देखील भर दिला जातो. चांदीचे कॉईन्स, मुर्ती, वस्तू या गिफ्ट देण्यासाठी खरेदी केल्या जातात. दरम्यान, आज दिवाळी पाडव्यानिमित्त चांदीचा दर 63,692 प्रति किलो असा आहे.

सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. विशेष म्हणजे या पर्यायामुळे कोविड-19 संकटात गर्दीची ठिकाणं टाळता येतील.