Gold Price Today: दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसह भारतील प्रमुख शहरांतील सोने दर घ्या जाणून
शहरानुसार दर आणि किमतींवर परिणाम करणारे घटक तपासा.
भारतीय सराफा बाजारात सोने दरात (Gold Prices India) आज (26 डिसेंबर) किरकोळ वाढ (December 26 Gold Rates) नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याची किंमत ( 24-carat Gold Price) प्रति ग्रॅम 7,773 रुपये झाली, जी मागील दिवसाच्या तुलनेत 28 रुपयांची वाढ दर्शवते. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 25 रुपयांनी वाढून 7,125 रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1.42 टक्के घसरण झाली, तर मासिक बदल 3.7 टक्के नोंदवला गेला. भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे दर पाहायला मिळतात. अर्थात येथे देण्यात आलेले दर कोणत्याही करांशिवाय असतात. एकूण जीएसटी, स्थानिक कर आणि इतर बाबींचा अतर्भाव झाल्यास, त्याचे दर बदलू शकतात.
भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
- दिल्लीः 24 कॅरेटः 77,880 रुपये, 22 कॅरेटः 71,400 रुपये
- मुंबईः 24 कॅरेटः 77,730 रुपये, 22 कॅरेटः 71,250 रुपये
- चेन्नईः 24 कॅरेटः 77,730 रुपये, 22 कॅरेटः 71,250 रुपये
- कोलकाताः 24 कॅरेटः 77,730 रुपये, 22 कॅरेटः 71,250 रुपये
- जयपूरः 24 कॅरेटः 77,880 रुपये
- लखनौः 24 कॅरेटः 77,880 रुपये
- चंदीगडः 24 कॅरेटः 77,880 रुपये (हेही वाचा, Amravati Soneri Bhog Mithai: काय सांगता? दिवाळीत अमरावतीमध्ये विकली जात आहे 24 कॅरेट सोन्याचे काम असलेली 'सोनेरी भोग मिठाई'; किंमत 14 हजार रुपये किलो, जाणून घ्या सविस्तर)
भारतातील सोन्याच्या किंमतींवर परिणाम करणारे घटक
भारतातील सोन्याच्या किमतींवर अनेक घटकांचा परिणाम होतो, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहेः
- आंतरराष्ट्रीय सोन्याचे दरः जागतिक बाजारपेठेतील कल स्थानिक किंमती निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
- चलन विनिमय दरः अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यातील चढउतारांचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होतो.
- मागणी आणि पुरवठाः सोन्याच्या दागिन्यांची हंगामी आणि सणासुदीची मागणी किंमतींवर प्रभाव टाकते.
- व्याज दरः उच्च व्याज दरांमुळे अनेकदा सोन्याचे दर कमी होतात आणि उलट.
- सरकारी धोरणेः आयात शुल्क आणि कर धोरणांचा सोन्याच्या दरांवर परिणाम होतो.
- जागतिक आर्थिक परिस्थितीः आर्थिक अनिश्चितता अनेकदा गुंतवणूकदारांना सुरक्षित-आश्रय मालमत्ता म्हणून सोन्याकडे ढकलते.
भारतामध्ये सोने धातूस विशेष महत्त्व आहे. सोने हा धातू पारंपरिक पद्धतीने खरेदी करतात. त्याचे दागिने बनवतात आणि परिधान करतात. अनेक लोक सोने खरेदी ही केवळ गुंतवणूक म्हणून घेतात. भारतीय अर्थव्यवस्थेत सोने धातूचे महत्त्व मोठे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे या दरांकडे जगभराचे लक्ष लागून राहिलेले असते.