Gold Price Today: सोन्याने साठी गाठली; प्रति 10 ग्रॅम सुवर्ण झळाळी प्रथमच 60,000 रुपयांवर, वाचा सविस्तर
सराफा बाजार सुरु होताच सोने प्रति 10 ग्रॅम 59671 रुपये इतक्या तेजीने उघडले. हेच सेने आदल्या दिवशी बाजार बंद झाला तेव्हा प्रति 10 ग्रॅम 58220 रुपये दराने विकले जात होते. त्यामुळे सोने दरात आज प्रति तोळा 1451 रुपयांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. या पूर्वी सोने दराने 2 फेब्रुवारी या दिवशी उच्चांक गाठला होता
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर भारतीय सोने दराचे (Gold Price Today) सर्व उच्चांक मोडीत निघाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोने प्रति 10 ग्रॅम म्हणजे प्रति तोळा 60,000 च्या वरती गेलेले पाहायला मिळाले. सराफाबाजारातील ही सर्वात मोठी आणि दरांच्या चडउतारातील विक्रमी घटना मानली जात आहे. सोन्यासोबतच चांदी दरातही वाढ झाली. सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव $1,998.60 प्रति औंस तर चांदीचा भाव 0.73 टक्क्यांनी वाढून $22.615 प्रति औंस झाला. इंडियन बुलियन ज्वैलर्स एसोशिएशनच्या हवाल्याने गुडरिटर्न्स बेवसाईटने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सराफा बाजार उघडला तेव्हा कोणत्याही कराशिवाय सेने दर प्रति दहा ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा 59671 रुपये इतके होते.
सराफा बाजार सुरु होताच सोने प्रति 10 ग्रॅम 59671 रुपये इतक्या तेजीने उघडले. हेच सेने आदल्या दिवशी बाजार बंद झाला तेव्हा प्रति 10 ग्रॅम 58220 रुपये दराने विकले जात होते. त्यामुळे सोने दरात आज प्रति तोळा 1451 रुपयांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. या पूर्वी सोने दराने 2 फेब्रुवारी या दिवशी उच्चांक गाठला होता. 2 फेब्रुवारी 2023 या दिवशी सोने 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. (हेही वाचा, World's Most Expensive Ice Cream: दुबईमध्ये विकले जात आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; होत आहे 23 कॅरेट सोन्याचा वापर, जाणून घ्या किंमत (Watch Video))
महाराष्ट्रातील आजचे सोने दर (कोणत्याही कराशिवाय)
मुंबई- 54,800 (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 54,800 (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर-54,800 (प्रति 10 ग्रॅम)
नाशिक- 54,830(प्रति 10 ग्रॅम)
दरम्यान, कोणत्याही सोन्यास 0 ते 24 या परिमानात मोजले जाते. या परिमानास कॅरेट म्हटले जाते. या कॅरेटमध्येही तीन प्रकार असतात. पहिला 24 कॅरेट (24 Carat Gold), दुसरा 23 कॅरेट (23 Carat Gold) आणि तिसरा 22 कॅरेट (22 Carat Gold). 24 कॅरेटचे सोने सर्वात शुद्ध मानले जाते. 24 कॅरेटचे सोने हे 99.9% इतकी गुणवत्ता दाखवते. 22 कॅरेटचे सोने हे 91% शुद्ध असते. म्हणजेच त्यात 9% इतर धातू मिसळले जातात. हे प्रामुख्याने धातू तांबे आणि झिंक असते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2023 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

