सोन्याच्या भावात सातत्याने घसरण, सराफ बाजारमधील दर जाणून घ्या
सोन्याच्या भावात गेले काही दिवस सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. तर सोमवारी (18 मार्च) सुद्धा सोन्याचे भाव कमी झाले आहेत.
सोन्याच्या भावात गेले काही दिवस सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. तर सोमवारी (18 मार्च) सुद्धा सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्याचसोबत चांदीचे भावसुद्धा खाली आले आहेत. सराफ बाजारात ज्वेलर्सकडून सोन्या-चांदीची मागणी कमी झाल्याने त्यामध्ये फरक दिसून आला आहे. सोमवारी सोन्याचे भाव 280 रुपयांनी कमी झाले असून 32830 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तर चांदीसाठी 345 रुपये कमी होऊन 38725 रुपये प्रति किलो झाले आहे. चांदीसाठी इंडस्ट्रियल यूनिट आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी करण्यात आली नाही.
ट्रेडर्स यांच्या मते, जागतिक बाजारात कमकुवत संकेतांमुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. तर शेअर मार्केटमध्ये वाढ आणि डॉलर स्थिर राहिल्याने सोन्याच्या भावावर परिणाम झाला. या आठवड्यात फेडरल रिजर्व्ह यांची बैठक होणार आहे.(हेही वाचा-आज सोन्याचे भाव घसरले, ग्राहकांना दिलासा)
जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोन्याचा दर 1299.3 डॉलर प्रति औंस राहिला. तर चांदीचे दर 15.34 डॉलर प्रति औंस आहे. त्याचसोबत दिल्लीत सराफ बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोने क्रमश: 280-280 रुपयांनी कमी होऊन 32,830 आणि 32,660 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2019 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

