मास्क न घातल्याने बकरीला अटक, उत्तर प्रदेशातील विचित्र घटना उघडकीस
बेकनगंज येथील ही घटना असून बकीरा ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला पोलीस स्थानकात घेऊन गेले. हा प्रकार जेव्हा बकरीच्या मालकाला कळला तेव्हा त्याने तातडीने पोलीस स्थानकात धाव घेतली.
कोरोना व्हायरसमुळे Coronavirus) सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य आहे. याच दरम्यान आता कानपूर (Kanpur) मधील एक विचित्र घटना समोर आली असून मास्क न घातल्याने बकरीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. बेकनगंज येथील ही घटना असून बकीरा ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला पोलीस स्थानकात घेऊन गेले. हा प्रकार जेव्हा बकरीच्या मालकाला कळला तेव्हा त्याने तातडीने पोलीस स्थानकात धाव घेतली.(COVID 19 च्या निदान साठी अद्ययावत लॅब्सचंं मुंबई, नोएडा, कोलकाता मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; पहा त्याची वैशिष्ट्य)
या प्रकरणी एका पोलिसाने पुढे असे ही म्हटले आहे की, लॉकडाऊने उल्लंघन केल्याने आणि बकरीने मास्क घातला नव्हता त्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आले. तसेच जर लोक कुत्र्यांना मास्क घातल आहेत तर बकऱ्यांना का नाही घालू शकत असा प्रश्न सुद्धा त्याने उपस्थितीत केला आहे. या प्रकरणी आता सोशल मीडियात लोकांकडून थट्टा केली जात आहे.