गोव्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने मडगाव येथे स्पेशल ट्रेनला थांबा न देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सुचना
परंतु 18 मे पूर्वी नागरिकांना चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात कोणत्या गोष्टींना सूट दिली जाणार यासंबंधित स्पष्ट करण्यात येणार आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर केला आहे. परंतु 18 मे पूर्वी नागरिकांना चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात कोणत्या गोष्टींना सूट दिली जाणार यासंबंधित स्पष्ट करण्यात येणार आहे. मात्र गोवा हे देशातील पहिले कोरोना मुक्त राज्य ठरले होते. परंतु आता गोव्यात आणखी 7 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यामुळेच आता गोव्यातील मडगाव येथे स्पेशल ट्रेनला थांबा न देण्याची सुचना प्रमोद सावंत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी गोवा येथून स्थलांतरित कामगारांना घेऊन स्पेशल ट्रेन सोडण्यात आली होती.(Coronavirus लॉक डाऊनमुळे एप्रिलमध्ये 21 राज्यांचे 97,100 कोटींचे नुकसान; गुजरात आघाडीवर- India Ratings)
गोव्यात कोरोनामुक्त राज्य झाल्यानंतर सुद्धा लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले जात आहे. तसेच गोव्यात अद्याप नाईट लाईफ, ब्युटीपार्लर, मसाज सेंटर, चित्रपटगृहांसह अन्य गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचसोबत पर्यटनाला सुद्धा गोव्यात बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.गोवा सध्या ग्रीन झोनमध्ये असला तरीही नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली आहे.(कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात COVID19 चे 7 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ)
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 81970 वर पोहचला आहे. त्यापैकी 51401 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 2649 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. भारतात सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे. काल रात्री राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आत्तापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 1600 पेक्षा अधिक रूग्ण आढळल्याने चिंतेमध्ये वाढ झाली आहे.