कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात COVID19 चे 7 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील बहुतांश राज्य हे रेड झोनमध्ये असून कोरोनाच्या विरोधात लढमण्यासाठी सर्वोतोपरी पावले उचलली जात आहे. परंतु देशातील पहिले कोरोनामुक्त ठरलेल्या गोव्यात आता पुन्हा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे.

कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात COVID19 चे 7 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील बहुतांश राज्य हे रेड झोनमध्ये असून कोरोनाच्या विरोधात लढमण्यासाठी सर्वोतोपरी पावले उचलली जात आहे. परंतु देशातील पहिले कोरोनामुक्त ठरलेल्या गोव्यात (Goa) आता पुन्हा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. गोव्यात आता कोरोनाचे नवे 7 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गोवा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे तरीही येथे लॉकडाउनच्या आदेशाचे पालन केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. तसेच गोव्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे खबरदारी सुद्धा घेतली जात आहे.

गोव्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर गुजरात येथून माल घेऊन आलेल्या ट्रकमधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई येथून गोव्यात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण आणि त्यांच्या ड्रायव्हरची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 13 एप्रिल पर्यंत गोव्यातील सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे गोवा राज्य कोरोनामुक्त राज्य झाले होते. परंतु आता 7 नवे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर मडगाव मधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.(Coronavirus in India: मागील 24 तासांत 3722 नव्या रुग्णांसह देशातील कोरोना बाधितांची संख्या 78003 वर)

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात आणखी 3722 कोरोनाबाधित रुग्ण तर 134 जणांचा बळी देला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाबाधित 78003 असून त्यात 49219 अॅक्टिव रुग्ण आहेत. आतपर्यंत 26235 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आहे. 2549 जणांचा बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून मुंबई आणि पुण्यात कोविड19 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2020 09:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).