Ghaziabad Likely To Renamed: गाझियाबाद शहराचे नाव बदलून गजनगर किंवा हरनंदी नगर होण्याची शक्यता
या मागणीवर सरकारद्वारे निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या नवीन नावासाठी प्रस्तावित पर्याय म्हणून गजनगर (Gajnagar) आणि हरनंदी नगर ( Harnandi Nagar) ही नावे स्वीकारली जावीत, अशी मागणी करत भाजपच्या एका नगरसेवकाने दिला मांडला आहे.
राजधानी दिल्ली शहरापासून जवळच असलेल्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव (Ghaziabad Name Change) बदलण्याची मागणी अनेकदा झाली आहे. या मागणीवर सरकारद्वारे निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या नवीन नावासाठी प्रस्तावित पर्याय म्हणून गजनगर (Gajnagar) आणि हरनंदी नगर ( Harnandi Nagar) ही नावे स्वीकारली जावीत, अशी मागणी करत भाजपच्या एका नगरसेवकाने प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव गाझियाबाद नागरी संस्थेच्या नगरसेवकांच्या आगामी बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. नागरी मंडळात भाजपचे बहुमत पाहता, नाव बदलाचा निर्णय कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाण्याची शक्यता आहे.
गाझियाबाद ऐतिहासिक महत्त्व असेले शहर
गाझियाबाद शहराचे विद्यमान महापौर सुनीता दयाल यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात एनडीटीव्हीने म्हटले आहे की, काही काळापासून शहराचे नाव बदलण्यासाठी विनंत्या केल्या जात आहेत. मात्र, कार्यकारिणीच्या स्तरावर याबाबत विचारविनिमय होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे की, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वसलेले गाझियाबाद हे ऐतिहासिक महत्त्व असेले शहर आहे. या शहराला त्याच्या ऐतिहासिक उंचीचे प्रतिबिंब असलेले नाव असणे आहे. (हेही वाचा, Ghaziabad Horror: चहा बनवण्यास 10 मिनिटे झाला उशीर; पतीने पत्नीची तलवारीने 15 वार करून केली हत्या)
गाझियाबादचा संबंध हस्तिनापूरशी
गाझियाबाद शहरातील दुधेश्वर नाथ मंदिराचे मुख्य पुजारी महंत नारायण गिरी हे शहराचे नाव बदलण्याच्या मोहिमेती एक प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी गाझियाबादचा संबंध हस्तिनापूरशी जोडला. ही भूमी हिंदू ग्रंथांमध्ये कुरु राज्याची राजधानी म्हणून वर्णन केली गेली आहे. त्यामुळे या शहराचे नाव ती ओळख सांगणारे असावे. सन 2018 मध्ये अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले. अलिकडील काही काळामध्ये शहरांची नावे बदलण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. (हेही वाचा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा)
उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावे बदलण्याची मोहीम
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये, घागरा नदीचे नाव बदलून सरयू ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. ज्याचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये केला गेला होता. जी अयोध्येतून वाहते असे मानले जाते. 2021 मध्ये, फैजाबाद जंक्शन अयोध्या कॅन्टोन्मेंट बनले आणि झाशी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने अलिकडेच दिलेल्या परवानगीने उत्तर प्रदेश राज्यातील आणखी दोन ठिकाणांची नावे बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गोरखपूर जिल्ह्यातील मुंडेरा बाजार चौरी-चौरा आणि देवरिया जिल्ह्यातील तेलिया अफगाण गाव तेलिया शुक्ला होण्याच्या मार्गावर आहे. या राज्यात नामांतराचा ट्रेंड सुरु असताना गाझियाबादच्या नवीन ओळखीबद्दल चर्चा चर्चा सुरु झाली आहे.