गाझियाबाद: बलात्काराचा खोटा खटला दाखल करणाऱ्या महिलेला कोर्टाने सुनावला 20 हजारांचा दंड
दंडातील 50 टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला दिली जाईल असे आदेश ही देण्यात आले आहेत.
गाझियाबाद: बलात्कार प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्यापासून ते कोर्टात खटला दाखल केल्याप्रकरणी एका महिलेला 20 हजारांचा दंड कोर्टाने सुनावला आहे. दंडातील 50 टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला दिली जाईल असे आदेश ही देण्यात आले आहेत. कोर्टाने आरोपीला दोषीपासून मुक्त केले आहे. ही घटना गाझियाबाद येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.(Student Suicide: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुरतमधील धक्कादायक प्रकार)
विशेष पॉक्सो अॅक्ट कोर्टाचे विशेष लोक अभियोजक उत्कर्ष वत्स यांनी असे म्हटले की, लोनी बॉर्डर क्षेत्रात एक महिला भाड्याने राहत होती. त्याच घरात रजत सुद्धा भाड्याने राहत होता. सदर महिलेने 6 ऑक्टोंबर 2020 रोजी रजतने तिच्या मुलीचा बलात्कार केल्याचा आरोप लगावला होता. महिलेच्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी रजत याला अटक करत त्याची तुरुंगात रवानगी केली होती.
पीडित रजत या प्रकरणी 3 महिने त्याची शिक्षा भोगत होता. परंतु त्याला नंतर जामीन मिळाला. या प्रकरणाची सुनावणी पॉक्सो कोर्टात झाली असता शनिवारी अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यावेळी न्यायाधीस महेंद्र श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने साक्षता देणाऱ्यांवरुन बलात्कार केल्याची घटना खोटी असल्याचे उघड केले. या आधारावर कोर्टाने रजत याची आरोपातून मुक्तता केली.(Chhattisgarh: फोन लपवल्याने मुलीने केली वडीलांची हत्या, आईच्या मदतीने अंगणात पुरला मृतदेह)
तर बलात्कार प्रकरणी खोटा खटला दाखल केल्याप्रकरणी महिलेला 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर दंडाची अर्धी रक्कम पीडितला दिल्यानंतर तिला 15 दिवस तुरुंवास भोगावा लागणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.