Gautam Adani Slips to 10th In Global Rich List: गौतम अदाणी यांना पुन्हा झटका, जगभरातील श्रीमंतांच्या टॉप- 10 यादीतून बाहेर; Hindenburg Research संस्थेच्या अहावालाचा फटका

स्टॉक मार्केटमध्ये अदानींच्या समभागांची घसरण सुरुच आहे. असे असताना आता जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 यादीतूनही गौतम अदानी (Gautam Adani Slips to 10th In Global Rich List) बाहेर फेकले गेले आहेत.

Adani Group | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गौतम अदाणी (Gautam Adani ) आणि अदाणी समूहाला (Adani Group हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेचा अहवाल आल्यापासून दररोज नवनवे धक्के बसत आहेत. स्टॉक मार्केटमध्ये अदानींच्या समभागांची घसरण सुरुच आहे. असे असताना आता जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 यादीतूनही गौतम अदानी (Gautam Adani Slips to 10th In Global Rich List) बाहेर फेकले गेले आहेत. अदाणी समूहासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून अदानी यांनी आतापर्यंत 36.1 अब्ज अरब डॉलर इतकी संपत्ती गमावली आहे. त्यामुळे गौतम अदाणी आणि अदाणी समूहाचे पुढे होणार तरी काय? याबातब गुंतवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत जोरदार चर्चा आणि उत्सुकता आहे.

अमेरिकेची गुंतवणूक आणि संशोधन फर्म तसेच शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने नुकताच एक अहवाल दिला. हा अहवाल अदाणी समूहाती गुंतवणूक आणि त्यातील वास्तवता दाखवणारा होता. संस्थेने आपल्या अहवालात दावा केला आहे की, अदाणी यांच्या कंपन्यांनी केलेली गुंतवणूक आणि फुगलेला संपत्तीचा आकडा हा कर्जाच्या डोलाऱ्यावर उभा आहे. इतकेच नव्हे तर स्टॉक मार्केटमध्ये अदाणी समूहाच्या कंपन्यांचे समभाग हे चक्क 85% फुगवण्यात आले आहेत. त्यामुळे हा एक मोठा घोटाळा आहे. यावरुन अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग यांच्या आरोप प्रत्यारोप आणि प्रश्नोत्तरांच्या फैरी झडत आहेत. या सगळ्यात अदाणी यांच्यावरील विश्वासार्हतेसमोरच प्रश्न उपस्थित राहिल्याने समभाग कोसळत आहे. ज्याचा परिणाम अदाणी समूहाच्या संपत्तीवरही होतो आहे. (हेही वाचा, Adani Group And Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाचा अदानी साम्राज्याला धक्का; कायदेशीर कारवाईची शक्यता, शेअर बाजारातही खळबळ)

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमत्वांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले अदाणी थेट घसरत घसरत 11 व्या स्थानावर जाऊन पोहोचले. इतकेच नव्हे तर टॉप टेन मधून बाहेर पडल्यावर आता ते कोणते स्थान गाठात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. गौतम अदाणी यांची मालमत्ता 36.01 अब्ज डॉलरने कमी होऊन ती 84.21 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये कार्लोस स्लिमला पाठिमागे टाकत अदाणी आता चक्क 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

गौतम अदाणी आणि मुकेश अंबाणी हे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले दोन प्रमुख भारतीय उद्योगपती आहेत. त्यापैकी मुकेश अंबाणी हे 12 स्थानावर आहेत. तर आता गौतम अदाणी 11 व्या स्थानावर आले आहेत. त्यामुळे आता अंबाणांनाही मागे टाकत अदाणी त्याही खाली घसरणार का? याबाबत मोठी उत्सुकता आहे. आकडेवारीनुसार अंबाणी यांची संपत्ती 82.2 अब्ज डॉलर इतकी आहे. तर 9 व्या स्थानावर असलेल्या सर्जी ब्रिन यंची संपत्ती 86.4 अब्ज डॉलर इकती आहे.