Gas Cylinder Price Hike: गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
तर आजपासून (1 डिसेंबर) शासकीय तेल कंपन्यांच्या गॅस सिलिंडरच्या दरात भरघोस वाढ करण्यात आली आहे.
Gas Cylinder Price Hike: सामान्य नागरिकांना महागाईचा दिवसागणिक फटका सहन करावा लागत आहे. तर आजपासून (1 डिसेंबर) शासकीय तेल कंपन्यांच्या गॅस सिलिंडरच्या दरात भरघोस वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 100 रुपयापर्यंत केली आहे. गेल्या महिन्यात सिलिंडर 266 रुपयांनी महागला होता. दरम्यान, किंमतीत झालेली वाढ ही फक्त कमर्शियल सिलिंडरवर करण्यात आली आहे. परंतु घरगुती गॅस सिलिंडर (LPG) च्या किंमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच घरगुती गॅससाठी तुम्हाला जुन्या दराने पैसे द्यावे लागणार आहेत.
आजपासून वाढ करण्यात आलेल्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमुळे दिल्लीत 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर 2100 रुपयांच्या पार गेले आहेत. या व्यतिरिक्त दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील कमर्शियल सिलिंडरचे नवे दर.(Petrol, Diesel Price Today: डिसेंबर 2021 च्या पहिल्याच दिवशी भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर घ्या जाणून)
-दिल्ली: 2101 रुपये
-कोलकाता: 2177 रुपये
-मुंबई: 2051
-चेन्नई: 2234
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या सब्सिडी शिवाय गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये, कोलकाता मध्ये 926 रुपये, मुंबईत 899.5 रुपये आणि चेन्नई 915.5 रुपये आहे. तर 6 ऑक्टोंबर मध्ये याच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झालेली नाही.
जर तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे नवे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही शासकीय तेल कंपन्यांची अधिकृत वेबसाइटवरुन पाहून शकता. त्यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx येथे भेट द्यावी. तर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे नवे रेट्स जाहीर केले जातात.