Gas Cylinder Found On Train Route: रुरकीमध्ये लष्कराच्या ट्रेन मार्गावर सापडला गॅस सिलिंडर; लोको पायलटने तातडीने लावला इमर्जन्सी ब्रेक लावला, चौकशी सुरू

शनिवारी स्टेशनजवळील रेल्वे रुळावर एलपीजी गॅस सिलिंडर पडलेला आढळून आला. रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर पडलेला लोको पायलटला दिसताच त्याने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली.

Gas Cylinder found on Train Route (फोटो सौजन्य - ANI)

Gas Cylinder Found On Train Route: रेल्वे ट्रॅक (Railway Track) वर पुन्हा एकदा रेल्वे अपघात (Train Accident) घडवून आणणारी वस्तू सापडली आहे. यावेळी उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये रेल्वे ट्रॅक (Railway Track) वर गॅस सिलिंडर (Gas Cylinder) सापडला आहे. ट्रेन रुळावरून उतरवण्याच्या कटाचा भाग म्हणून ट्रॅकवर सिलिंडर ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ट्रॅकवर गॅस सिलिंडर, रॉड अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत.

दरम्यान, आता समोर आलेले प्रकरण उत्तराखंडमधील रुरकीजवळील धांडेरा रेल्वे स्थानकाचे आहे. शनिवारी स्टेशनजवळील रेल्वे रुळावर एलपीजी गॅस सिलिंडर पडलेला आढळून आला. रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर पडलेला लोको पायलटला दिसताच त्याने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. मालगाडी चालकाने तात्काळ या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तेथून गॅस सिलिंडर काढला. सध्या रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा -Conspiracy To Overturn Train: पाटणा-गया रेल्वे मार्गावर ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर ठेवला मोठा दगड; थोडक्यात वाचले इस्लामपूर-हटिया एक्सप्रेसमधील प्रवाशांचे प्राण)

शनिवारी सकाळी 06:35 वाजता, मालगाडीच्या लोको पायलटने (BCNHL/32849) रुरकीच्या स्टेशन मास्टरला (RK) लांधौरा (LDR) आणि धांधेरा (DNRA) दरम्यान किमी 1553 वर एक सिलिंडर सापडला. घटनास्थळ डीएनआरए स्टेशनपासून सुमारे एक किमी अंतरावर आहे.  (हेही वाचा -Conspiracy To Bomb Army Train: मध्य प्रदेशात आर्मी स्पेशल ट्रेन उडवण्याचा प्रयत्न फसला; रेल्वे रुळांवर सापडले 10 डिटोनेटर)

ट्रेनच्या मार्गावर सापडला गॅस सिलिंडर - 

या घटनेची माहिती मिळताच पॉइंट्समन तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता सिलिंडर पूर्णपणे रिकामे असल्याचे दिसून आले. नंतर ते धांधेरा येथील स्टेशन मास्तरांच्या ताब्यात ठेवण्यात आले. या परिसराच्या एका बाजूला नागरी निवासी वसाहत आणि दुसऱ्या बाजूला आर्मी कॅन्टची सीमा भिंत आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस आणि जीआरपीला देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात स्थानिक पोलीस स्टेशन सिव्हिल लाइन्स/रुरकीमध्ये एफआयआर नोंदवला जात आहे.