Gandhi Jayanti 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन, विजयघाट येथे लालबहादु शास्त्री यांनाही वाहिली श्रद्धांजली

तेथे त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याआधी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप नेता लालकृष्ण आडवाणी यांच्यासह इतरही अनेक बडे नेते राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Narendra Modi, Sonia Gandhi, Manmohan Singh | (Photo Credits: Twitter/ ANI)

Gandhi Jayanti 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना अभिवादन केले. महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. गांधी जयंती निमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साबरमती रिवरफ्रंट येथेही जाणार आहे. इथे ते देश हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करतील. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी विजयघाट येथे जाऊन माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनाही अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता गांधी यांना अभिवादन केले तेव्हा त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिडला आणि इतर मान्यवरही होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट देतील. ते इथे सुमारे 20 हजारांहून अधिक गावच्या सरपंचांच्या उपस्थितीत देश हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करतील. (हेही वाचा, Mahatma Gandhi Jayanti 2019: महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' ही उपाधी कशी मिळाली?)

नरेंद्र मोदी ट्विट

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

पंतप्रधान मोदी यांनी राजघाटानंतर विजयघाट येथेही उपस्थिती दर्शवली. तेथे त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याआधी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप नेता लालकृष्ण आडवाणी यांच्यासह इतरही अनेक बडे नेते राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.