CDS General Bipin Rawat Antim Yatra: सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका आणि ब्रिगेडियर लिद्दर यांच्यावर आज अंतिम संस्कार
Lidder) यांच्यावर आज (10 डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत ( MI-17V5- Helicopter Crash) बुधवारी मृत्यू झाला.
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) रावत आणि ब्रिगेडियर लिद्दर (Brigadier L.S. Lidder) यांच्यावर आज (10 डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत ( MI-17V5- Helicopter Crash) बुधवारी मृत्यू झाला. ही घटना तामिळनाडू (Tamil nadu) राज्यातील सुलूर (Sulur) येथे घडली. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी दिल्ली येथे आणण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ जनरल रावत, मधुलिका रावत आणि ब्रिगेडियर लिद्दर (Brigadier L.S. Lidder) यांच्याच मृतदेहाची ओळख पटू शकली आहे. त्यामुळे आज केवळ या तिघांवरच शासकीय इतमामात (Last Rites of Soldiers) अंत्यसंस्कार केले जातील. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक साई तेजा, हवलदार सतपाल, विंग कमांडर पी एस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, जेडब्ल्यूओ दास आणि जेडब्ल्यूओ प्रदीप यांचा मृत्यू झाला.
जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्यावर शुक्रवारी सायंकळी 4 वाजता बरार स्क्वायर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जातील. या आधी त्यांचे पार्थीव सकाळी 11 ते 12.30 पर्यंत नागरिकांना अंतीम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थान 3 कामराज मार्ग येथे ठेवण्यात येईल. दुपारी 12.30 ते 1.30 वाजेबर्यंत सैन्यकर्मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली आर्पण करतील. सुमारे दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरु होईल. सायंकाळी 4 वाजता बरार स्क्वायर स्मशानभूमिक त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले जातील.याशिवाय ब्रिगेडियर एस एस लिडर यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. (हेही वाचा, Who Will Be Next CDS: बिपिन रावत यांच्या निधनानंतर देशातील आगामी CDS कोण होणार? शर्यतीत ही दोन नावे पुढे)
दरम्यान, हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्व मृतांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी दिल्ली येथे आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उच्चपदस्त अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 13 जणांच्या पार्थीवावर पुष्पहार अर्पण केला. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh), राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल (NSA Ajit Doval), लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे (General MM Naravane), हवाई दल प्रमुख एडमिरल आर हरि कुमार (Admiral Hari Kumar), एयर चीफ मार्शल ए.वी.आर चौधरी (Air Chief Marshal AVR Chaudhary), संरक्षण सचिव अजय कुमार (Defence Sec Ajay Kumar) यांनीही श्रद्धांजली आर्पण केली.