आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी भारता कडून आजपासून Quarantine नियमांमध्ये शिथिलता
जगभरामध्ये सध्या कोरोना रूग्णांचा आकडा 243.6 मिलियन वर पोहचला आहे. तर लस घेतलेल्यांचा आकडा 6.80 बिलियन वर आहे.
भारतामध्ये आजपासून परदेशी प्रवाशी नागरिकांसाठी (International Travelers) नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजुरी दिलेल्या कोरोना लसींचे डोस घेतलेल्यांना आता भारतामध्ये विमानतळावर कोणत्याही टेस्टिंग शिवाय, होम क्वारंटीन (Home Quarantine) शिवाय येता येणार आहे. परदेशी प्रवाशांसाठी मागील बुधवारी ही नवी गाईडलाईन (SOP) जारी करण्यात आली होती. मात्र कोविड 19 निगेटीव्ह आरटी पीसीआर रिपोर्ट (COVID Negative RT PCT Test) मात्र सादर करणं बंधनकारक असणार आहे.
भारत सरकार कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोविड 19 जागतिक महामारी मध्ये SARS-CoV-2 variants of concern हा सातत्याने आपलं रूप बदलत आहे. वायरसचं बदलतं रूप यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे त्यांनी सांगितले आहे. सोबतच त्यांनी जगभरामध्ये वाढते कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि बदलती परिस्थिती पाहता आता भारतामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. नक्की वाचा: Corona Virus Update: अखेर अमेरिकेने 19 महिन्यांनंतर भारतीयांसाठी उघडले दरवाजे, 'या' तारखेपासून करु शकतात प्रवास.
पहा काय आहे SOP
1. प्रवासीने लस घेतली नसेल किंवा एकच डोस घेतला असेल तर त्याला एअरपोर्टवर सॅम्पल्स द्यावे लागतील. त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटीन राहावं लागेल. 8व्या दिवशी पुन्हा टेस्ट करावी लागेल. जर रिपोर्ट निगेटीव्ह आला तर पुढील 7 दिवस त्यांना सेल्फ मॉनिटर करावं लागणार आहे.
2. नव्या गाईडलाईंस इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स साठी प्रोटोकॉल देणार्या आहेत. यामध्ये एअरलाइन्स, सी बॉर्डर्स किंवा लॅन्ड बॉर्डर्स वर नियम सारखे असतील.
3. एसओपी सोमवार (25 ऑक्टोबर) पासून पुढील आदेशापर्यंत व्हॅलिड असणार आहे. रिस्क असेसमेंट वर डॉक्युमेंट्स वेळच्या वेळी पाहिली जाणार आहेत.
4.Air Suvidha portal वर प्रवाशांना सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच निगेटीव्ह कोविड टेस्ट रिपोर्ट देखील द्यावा लागेल. प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी हा रिपोर्ट बनवणं आवश्यक आहे.
5. दरम्यान प्रवाशांनी डिक्लरेशन फॉर्म सादर करताना कोणतीही छेडछाड करू नये. तसे आढळल्यास क्रिमिनल प्रॉसिक्युशनला सामोरं जावं लागणार आहे.
6. होम क्वारंटीन किंवा सेल्फ हेल्थ मॉनिटरिंग दरम्यान कुणाला त्रास झाल्यास, कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना नजिकच्या हेल्थ फॅसिलिटी मध्ये किंवा नॅशनल हेल्पलाईन नंबर 1075 किंवा स्टेट हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा लागणार आहे.
जगभरामध्ये सध्या कोरोना रूग्णांचा आकडा 243.6 मिलियन वर पोहचला आहे. तर लस घेतलेल्यांचा आकडा 6.80 बिलियन वर आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)