UK High Court: विजय माल्या याला लंडन कोर्टाचा दणका, भारतीय बँका मद्यसम्राटाकडून पैसे वसुल करण्यापासून काहीच पावले दूर
त्यामुळे विजय माल्या याच्यावरकडून थकीत पैशांबाबत वसुली करण्याचा भारतीय बँकांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विजय माल्या याच्याकडील पैसा वसूल करण्याच्या काहीच पावले दूर आहे.
उद्योगपती विजय माल्या (Vijay Mallya) याची दिवाळखोरीबाबतची याचिका (Bankruptcy Petition) इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने (United Kingdom High Court) फेटाळली आहे. त्यामुळे विजय माल्या याच्यावरकडून थकीत पैशांबाबत वसुली करण्याचा भारतीय बँकांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विजय माल्या याच्याकडील पैसा वसूल करण्याच्या काहीच पावले दूर आहे. इंग्लंडमधील उच्च न्यायालयाने भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या नेतृत्वात भारतीय बँक समूहाला विजय माल्या याच्या दिवाळखोर झालेल्या कंपनी किंगफीशर एअरलाईन्स कडून कर्ज वसूलीसंबंधी कारवाई करण्यास मंगळवारी परवानगी दिली.
न्यायालयाने याचिकेत सुधारणा करण्याच्या मागणीला बरोबर ठरवले आणि म्हटले की, कोणतीही बँक भारतात जप्त केलेल्या विजय मल्या यांच्या संपत्तीला बंधनमूक्त करु शकते. जेणेकरुन दिवाळखोरी प्रकरणात सर्व कर्जदारांना फायदा होऊ शकेल. या याचिकेच्या माध्यमातून याचिकाकर्त्या बँकांनी आर्थिक गुन्हेगार माल्या याच्या भारतातील सर्व संपत्तीवरुन त्याचा अधिकार काढून टाकण्याची मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. असे केल्यास दिवाळखोर व्यक्तीकडून कर्ज देणाऱ्या सर्व कर्ज देणाऱ्यांना (बँका) आपला पैसा परत घेण्यासाठी फायदा होऊ शकेल. (हेही वाचा, Vijay Mallya Assets Seized: विजय माल्या याची फ्रान्स मधील तब्बल 1.6 मिलियन युरोची प्रॉपर्टी ED कडून जप्त)
मुख्य दिवाळखोर एवं कंपनी न्यायालयात (ICC) मध्ये न्यायाधीश मायकेल ब्रिक्स यांच्यासमोर एक व्हर्च्युअल सुनावणी झाली. दोन्ही पक्षांमध्ये गेल्या वर्षी दाखल दिवाळखोर याचिकेत सुधारणेनंतर आपली अंतिम मते मांडली. एसबीआयशिवाय इतर बँकांनीही आपले म्हणने मांडले यात. बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जम्मू अँड कश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, यूको बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनानशिअल एसेट्स रिकंन्स्ट्रक्षण कंपनी प्रा. लि. यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती ब्रिग्स यांनी म्हटले होते की, ते आता जबाबांवर विचार करतील आणि योग्य वेळी निर्णय देतील. दरम्यान, विजय माल्या आपल्या दिवाळखोर किंगफिशर एअरलाईन्सशी संबंधीत 9,000 कोटी रुपयांचे कर्ज जाणीवपूर्वक न चुकते करणारा आरोपी आहे.