Madhya Pradesh: सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; मध्यप्रदेशमधील घटना

त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर झोपलेले पती, पत्नी आणि दोन मुलांचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू झाला.

Fire प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Madhya Pradesh: देवास येथे शनिवारी पहाटे एका घराला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर झोपलेले पती, पत्नी आणि दोन मुलांचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू झाला. खाली असलेल्या डेअरीत गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder Explosion)झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या मजल्यावर दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यात आले होते, त्यामुळे आग नियंत्रणाबाहेर गेली.(Fire at Kolkata Slum: पूर्व कोलकाता येथील टोप्सिया भागातील झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल)

ही घटना नयापुरा परिसरात घडली. घराच्या खालच्या मजल्यावर ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली. दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवण्यास सुरुवात केली, मात्र वर जाणारा रस्ता अरुंद असल्याने बचावकार्य पथकाला करता आले नाही.

या अपघातात दिनेश सुतार (35), त्यांची पत्नी गायत्री सुतार (30), मुलगी इशिका सुतार (10) आणि मुलगा चिराग सुतार (7) या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. आगीचे कारण शोधण्यासाठी एफएसएल टीम तपास करणार आहे.

सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली आग

पहाटे ४.४८ वाजता नयापुरा भागातील आर्यन मिल्क कॉर्नर येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. बचावकार्यानंतर एक पुरुष, एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. वर जाण्याचा मार्ग अरुंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif