आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी आता 4 तास आधी विमानतळावर पोहचावे लागणार

कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी आता देशातील सर्व विमानतळावर सुरक्षायंत्रणा अधिक कठोर करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) तणतणला आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी आता देशातील सर्व विमानतळावर सुरक्षायंत्रणा अधिक कठोर करण्यात आली आहे. बीसीएएसने (BCAS) सर्व विमाने आणि विमानतळांवरील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार देशाअंतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 तासी आधी विमानतळावर येण्याची सूचना दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांनी विमानतळावर प्रवासापूर्वी 4 आधी येण्याचे सांगण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा नियम 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत लागू करण्यात येणार आहे. मात्र इतर वेळी देशाअंतर्गत प्रवासासाठी विमानतळावर 2 तास आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3 तास आधी पोहचावे लागत होते. तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक वहानाची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे विमानतळावर पोहचल्यापासून ते विमानात बसण्यापर्यंत कसून तपासणी केली जाणार आहे. त्याचसोबत 30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर विझिटर पास सुद्धा देण्यात येणार नाही आहे.(दिशाभूल तसेच खोट्या जाहिराती करणे पडणार महागात; सेलिब्रिटींना होऊ शकतो तुरुंगवास, 10 लाखाचा दंड)

विमानतळावर सुरक्षा अधिक कठोर करण्याच्या दृष्टीने दारु पिऊन आल्यास आणि तो व्यक्ती पकडला गेल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हे कृत्य जर पायलटने केल्यास त्याचे लायसन्स रद्द केले जाणार आहे. तसेच परवानाशिवाय काम करणाऱ्या व्यक्तीला नोकरीवरु काढून टाकण्यात येणार आहे.