Firecrackers Ban in India 2022: भारतात कुठल्या राज्यामध्ये फटाके फोडण्यावर बंदी आणि कुठे मर्यादित परवानगी हे घ्या जाणून

चंदीगड मध्येही फटाक्यांवर बंदी कायम ठेवली आहे.

Firecrackers | Photo Credits: Pixabay

दिवाळी (Diwali) हा सण प्रकाशाचा आहे. दिव्यांचा उत्सव साजरा करण्याची हिंदू धर्मीयांची रीत आहे. यामध्ये जसे दिव्या,पणत्यांनी रोषणाई केली जाते तशीच ती मोठ्या प्रमाणात फटाके फोडून देखील केली जात असे. पण प्रदूषणा सारखी समस्या पाहता आता त्यावर थोडी बंधनं आली आहेत. मागीन दोन वर्ष कोरोना संकटामुळे फटाक्यांवर (Fire Crackers) कडक निर्बंध होते. पण हळूहळू स्थिती निवळत असल्याने पुन्हा दणक्यात दिवाळी साजरे करण्याचे प्लॅन्स रंगायला लागले आहेत. हे देखील नक्की वाचा: Deepotsav 2022: भाजप मुंबईमध्ये करणार 'दीपोत्सवा'चे आयोजन; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण .

दिवाळीच्या दिवसात बेसुमार फटाके फोडल्याने वाढणारं प्रदुषण आणि त्यामधून उद्भवणार्‍या आरोग्याच्या समस्या यामुळे भारतामध्ये काही राज्यात फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी आहे. मग पहा देशामध्ये कोणत्या राज्यात ही बंदी असणार आहे.

फटाकेबंदी भारतामध्ये कुठल्या राज्यात?

भारताची राजधानी दिल्ली मध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. जानेवारी 2022 पर्यंत दिल्लीवासियांना, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने फटाके विकण्यास आणि फोडण्यास बंदी घातली आहे. दिल्ली प्रमाणे हरियाणा आणि ओडिशा मध्येही फटाकेबंदी असणार आहे. चंदीगड मध्येही फटाक्यांवर बंदी कायम ठेवली आहे. हे चंदीगडचं फटाकेबंदीचं सलग दुसरं वर्ष आहे. तामिळनाडू मध्ये दिवसातून दोन वेळेस केवळ तासभर फटाके फोडण्यास परवानगी असणार आहे. पश्चिम बंगाल मध्ये केवळ ग्रीन क्रॅकर्स साठी परवानगी देण्यात आली आहे. पंजाब मध्ये केवळ 2 तास फटाके फोडता येणार आहेत. मुंबई मध्ये यंदा विना परवाना फटाके विकता येणार नाहीत. असे पोलिसांचे आदेश आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडूनही फटाक्यांवर टीपण्णी करताना राज्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. सण नक्की साजरा करा पण मानवी जीव धोक्यात घालून आनंदावर विरजण घालू नका असं आवाहन करत त्यांनी राज्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही सूचित केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif