पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या 'त्या' कलाकारांवर FIR दाखल; अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 जणांचा समावेश
त्यावेळी ही गोष्ट फारच गाजली होती. आता या सेलेब्जना यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. पत्र लिहिणाऱ्या या कलाकारांविरुद्ध आता एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रपट सृष्टीमधील काही कलाकारांनी एकत्र येऊन पीएम मोदी (PM Narendra Modi) यांना, मॉब लिंचिंगवर (Mob Lynching) कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यावेळी ही गोष्ट फारच गाजली होती. आता या सेलेब्जना यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. पत्र लिहिणाऱ्या या कलाकारांविरुद्ध आता एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. देशातील ढासळत असलेल्या सामाजिक वातावरणावर भाष्य करत हे पत्र लिहिण्यात आले होते. एकूण 49 जणांनी मोदींना पत्र लिहिले होते. या पत्रामुळे देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप केला गेला आहे.
हा एफआयआर मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्हा सदर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. माननीय कोर्टाच्या आदेशानंतर ही एफआयआर नोंदविण्यात आली आहे. वकील सुधीर ओझा यांनी 27/07/2019 रोजी न्यायालयात या चित्रपट सृष्टीमधील मंडळींविरोधात याचिका दाखल केली होती. या सर्वांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून देशातील असहिष्णुता आणि सर्रासपणे होत असलेला हिंसाचार निदर्शनास आणून दिला होता. यावर वकील सुधीर ओझा यांनी एका षडयंत्रांतर्गत परदेशात देशाची बदनामी केल्याचा आरोप करत न्यायालयात तक्रार दाखल केली. (हेही वाचा: मॉब लिंचिंग विरोधात अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 बॉलिवूड दिग्गजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र)
या पत्रावर अनुराग कश्यप, केतन मेहता, श्याम बेनेगल, रामचंद्र गुहा, शुभा मुद्गल, अपर्णा सेन आणि कोंकणा सेन शर्मा यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्वाक्षर्या आहेत. देशातील वाढत्या असहिष्णुतेकडे पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधणे हा हे पत्र लिहिण्याचा उद्देश होता. पत्रात असे लिहिले आहे की, आजकाल देशात धर्म, जात आणि मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान मोदींनी संसदेत मॉब लिंचिंगसारख्या बाबींचा उल्लेख के, परंतु अशा गंभीर बाबी केवळ संसदेत उपस्थित करणे पुरेसे नाही, त्यावर कठोर निर्णयदेखील घ्यावे लागतील.