FASTag आजपासून बंधनकारक; वाहनांवर स्टिकर न दिल्यास भरावा लागेल दुप्पट दंड

त्यामुळे टोल नाक्यावर जर का तुमच्या गाडीवर फास्टॅग स्टिकर दिसला नाही तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.

Fastag (Photo Credits: Twitter)

राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणा-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आजपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक झाले आहे. त्यामुळे टोल नाक्यावर जर का तुमच्या गाडीवर फास्टॅग स्टिकर दिसला नाही तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 'फास्टॅग' (FASTag) हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे. याच फास्टॅगच्या मदतीने आता टोल भरायचा आहे. यामुळे कोणत्याही टोलनाक्यावर कॅशमध्ये टोल वसूल केला जाणार नाही.

याआधी 1 डिसेंबर 2019 पासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर ती तारीख वाढवून 15 डिसेंबर करण्यात आली. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे 15 जानेवारीपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मोदी सरकारचा FASTag बाबत मोठा दिलासा; आता 15 जानेवारीपर्यंत टोल नाक्यावर भरा रोख पैसे

कुठे मिळेल 'FASTag'?

तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 100 रुपये आहे. त्याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला SBI च्या बँकेत जाऊन पॉइंट ऑफ सेल वर जावं लागेल. इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरून KYC डॉक्युमेंट्ची फोटोकॉपी द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या गाडीची RC, एक ID प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल. याशिवाय तुम्ही खाजगी बॅंकांमधूनही फास्टॅग खरेदी करू शकता. सिंडिकेट बॅंक, Axis बॅंक, IDFC बॅंक, HDFC बॅंक, ICICI बॅंक या बॅंकांतही फास्टॅग उपलब्ध करण्यात आले आहे.

कसे बनवाल फास्टॅग पास:

IHMCL/NHAI द्वारा 28,500 विक्री केंद्रावरुन तुम्हील हा पास खरेदी करु शकता. यात प्लाझा, आरटीओ, साझा सेवा केंद्र, परिवहन केंद्र, बँकेच्या शाखांचा समावेश आहे.