पंतप्रधान मोदी हे घ्या ४९० रुपये!, १९ टन बटाटा पिकवल्यावर शेतकऱ्याने पाठवली मनी ऑर्डर

कवळ प्रदीप शर्माच नव्हे तर इतरही अनके शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. उजराई गावचा रहिवासी दरयाब सिंह यानेही पुणे मार्केटला बटाटा पाठवला होता. सर्व खर्च वजा जाऊन त्याच्या हाती केवळ 604 रुपये लागले.

बटाटा उत्पादक शेतकऱ्याची पंतप्रधान मोदींना मनी ऑर्डर | (Archived and representative images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) नावाच्या एका बटाटा उत्पादक शेतकऱ्याने (Potato Farmer) 490 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे. या शेतकऱ्याने शेतीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करुन तब्बल 19 टन (19,000 किलो) बाटाटा पिकवला. या कष्टाचे फळ म्हणून त्याला चक्क 490 रुपये मिळाले. शेतकऱ्याच्या कष्टाचा हिशोब लावायचा तर, त्याला 50 किलोच्या प्रत्येक पोत्यामागे 1.33 रुपये इतकी रक्कम मिळाली. शेतमालाला आलेल्या भाव पाहून निराश झालेल्या या शेतकऱ्याने आलेली 490 रुपयांची रक्कम पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पाठवून दिली. हा शेतकरी उत्तर प्रदेशातील आगरा येथील नगला नाथू गावचा आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रदीप शर्मा याने 368 पोती बटाटा (साधारण 19 टन) महाराष्ट्रातील अकोला मार्केटला पाठवला होता. वेगवेगळ्या व्हरायटीमधील असलेले या बटाट्याला एकूण 94677 रुपये मिळाले. हा माल मार्केटला पाठविण्यासाठी त्याला वाहतूक खर्च 42,030 रुपये इतके आला. त्याशीवाय मार्केटमध्ये हमालांकचा वारणी खर्च 993 रुपये इतका आला. बटाटे विक्री करणाऱ्या दलालाने कमीशनच्या रुपात 3790 रुपये घेतले. बटाट्यांची व्हरायटी वेगवेगळी होती. त्यामुळे त्यातही प्रतवारी ठरवण्यात आली. हा सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हाती केवळ 400 रुपये लागले. बटाटा गोणीत बरून पॅक करण्यासाठी शेतकऱ्याने सुतळी वापरली. ही सुतळी 45 रुपयांची होती. दराच्या आशेने बटाटा कोल्ड स्टोअरेज (शितगृह) मध्ये ठेवण्यात आला. त्याचा खर्च 46 हजार रुपये इतका आला. सर्व खर्च वजा जाऊन शेतकऱ्याच्या हाती केवळ 490 रुपये आले. (हेही वाचा, पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर: संजय साठे यांची PMOकार्यालयाकडून दखल; कांद्याबाबत मागवली माहिती)

उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. कवळ प्रदीप शर्माच नव्हे तर इतरही अनके शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. उजराई गावचा रहिवासी दरयाब सिंह यानेही पुणे मार्केटला बटाटा पाठवला होता. सर्व खर्च वजा जाऊन त्याच्या हाती केवळ 604 रुपये लागले.