Fake Masala Seized in Delhi: दिल्ली मध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; भेसळीत अ‍ॅसिड, लाकडाच्या भुशाचा समावेश

जप्तींमध्ये बनावट मसाले बनवण्यासाठी कुजलेली पाने आणि तांदूळ, खराब झालेले बाजरी, लाकडाचा भुसा, मिरचीचे डोके, अ‍ॅसिड आणि बनावट उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल यांचा समावेश आहे.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय मसाल्यांशिवाय आपल्या जेवणात खरी लज्जत येतच नाही पण अशात आता दिल्ली पोलिसांनी ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागातील दोन कारखान्यांमध्ये तयार होत असलेले तब्बल 15 टन बनावट मसाले जप्त केले आहेत. प्रोसेसिंग युनिट्सच्या मालकांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांची नावं दिलीप सिंह (46) आणि सरफराज (32) आहे. हे दोघं युनिट्सचे मालक आहेत तर खुर्सिद मलिक (42) हा त्यांना हे भेसळयुक्त मसाले स्थानिक बाजारपेठा आणि दिल्ली/एनसीआरमधील विक्रेत्यांना मूळ उत्पादनांप्रमाणेच पुरवठा करत होता असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्याचं TOI चं वृत्त आहे.

जप्तींमध्ये कुजलेली पाने आणि तांदूळ, खराब झालेले बाजरी, लाकडाचा भुसा, मिरचीचे डोके, अ‍ॅसिड आणि बनावट उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल यांचा समावेश आहे, असे राकेश पावेरिया, डीसीपी (गुन्हे शाखा) म्हणाले. डीसीपी पावेरिया यांच्या माहितीनुसार, ईशान्य दिल्लीतील काही उत्पादक आणि दुकानदार विविध ब्रँड अंतर्गत भेसळयुक्त मसाल्यांच्या उत्पादनात आणि विक्रीत गुंतली आहेत.

"या माहितीच्या आधारे कारवाई करून, एक टीम तयार करण्यात आली. 1 मे दिवशी छापेमारी करण्यात आली. ऑपरेशन दरम्यान, सिंग एका प्रोसेसिंग युनिटमध्ये काम करत असल्याचे आढळून आले. जेथे तो खराब पाने, यांसारख्या खाण्यायोग्य नसलेल्या आणि बंदी असलेल्या पदार्थांचा वापर करून भेसळयुक्त हळद तयार करत होता. पळून जाण्याचा प्रयत्न करूनही सिंग आणि सरफराज या दोघांनाही पकडण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. सिंग हे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे मालक असल्याची कबुली देखील त्यांनी दिली आहे. मलिकने या भेसळयुक्त मसाल्यांचा पुरवठा केल्याचे कबूल केल्याचे चौकशीत समोर आले आहे. नक्की वाचा: Power Outage: अनियमित वीज पुरवठ्याच्या त्रासाला कंटाळून गेल्या 10 महिन्यांपासून कर्नाटकातील शेतकरी मिक्सरमध्ये मसाला दळण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी दररोज जातो वीज कार्यालयात.

चौकशीदरम्यान, हे उघड झाले की सिंग आणि सरफराज यांनी भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करून अधिक नफा मिळविण्यासाठी 2021 मध्ये त्यांची युनिट्स सुरू केली होत. मलिक हे भेसळयुक्त मसाल्यांच्या व्यवसायात येण्यापूर्वी कपड्यांच्या विक्री आणि खरेदीमध्ये काम करत होते. 2019 मध्ये त्यांनी ट्रान्सपोर्ट्ससाठी टेम्पोची खरेदी केली. पुढील तपासापर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement