Fake Investment Scheme: अजमेरमध्ये अवघ्या 19 वर्षांच्या मुलाने बनावट गुंतवणूक योजनेद्वारे 200 लोकांची केली फसवणूक; कमावले 42 लाख, पोलिसांकडून अटक
काशिफने याच मानसिकतेचा फायदा घेतला.
Fake Investment Scheme: राजस्थानमधील (Rajasthan) अजमेरमध्ये (Ajmer) एका 19 वर्षीय मुलाला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. हा मुलगा सध्या अकरावीचा विद्यार्थी आहे. पण त्याची ही कृती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आरोपीने सुमारे 200 लोकांची पैशांचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. याद्वारे त्याने इतका काळा पैसा कमावला की, त्याच्याकडे असणारी रोकड मोजण्यासाठी एक मशीन विकत घ्यावी लागली. काशिफ मिर्झा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. काशिफ मिर्झा हा इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे.
'एनडीटीव्ही'च्या रिपोर्टनुसार, काशिफने सोशल मीडियावर लोकांना चांगल्या रिटर्नचे आमिष दाखवले. 13 आठवड्यांत 40 हजार रुपये नफा कमावण्याचे स्वप्न त्याने दाखवले. या 11 वीच्या विद्यार्थ्याने त्याच्या फॉलोअर्सना सांगितले की, जर त्यांनी 99,999 रुपये गुंतवले, तर 13 आठवड्यांनंतर त्यांना 1,39,999 रुपये मिळतील. म्हणजे तीन महिने आणि एका आठवड्यात 40 हजार रुपये नफा प्राप्त होईल.
बरेच लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवतात आणि ते जाहिरात करत असलेली उत्पादने किंवा सेवा विकत घेतात. काशिफने याच मानसिकतेचा फायदा घेतला. त्याने आपल्या फॉलोअर्सची फसवणूक केली. खोटी आश्वासने देऊन तो लोकांना टार्गेट करत असे, असे पोलिसांनी सांगितले. सुमारे 200 लोकांना फसवून त्याने 42 लाख रुपये कमावले. (हेही वाचा: Kalyan Satta Matka Mumbai: मटका पन्ना काय असतो? जाणून घ्या याबद्दल सारं काही)
आरोपी विद्यार्थ्याने यापूर्वी काही लोकांना फायदा करून दिला होता, त्यामुळे नव्या लोकांना फसवणे त्यालां सोपे झाले. इतर लोकांना झालेला फायदा बघून अनेक नवीन लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. फायदा झालेल्या लोकांची ओळख त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना करून दिली. त्यामुळे इतर लोकही जाळ्यात अडकले. चौकशीअंती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. अनेक फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आले आहेत.