Blast in Telangana: तेलंगणात क्षेपणास्त्रांसाठी स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 3 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

मंगळवारी संध्याकाळी यदाद्रिभुवनगिरी जिल्ह्यातील मोटाकोंडूर मंडळातील प्रीमियर एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हा स्फोट झाला. काटेपल्ली गावात असलेल्या या कंपनीत झालेल्या स्फोटोत तीन जणांना जीव गमवावा लागला.

Blast प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit- X)

Blast in Telangana: तेलंगणामधील एका क्षेपणास्त्र इंधन उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात (Blast) तीन कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी यदाद्रिभुवनगिरी जिल्ह्यातील मोटाकोंडूर मंडळातील प्रीमियर एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेड (Premier Explosives Private Limited) मध्ये हा स्फोट झाला. काटेपल्ली गावात असलेल्या या कंपनीत झालेल्या स्फोटोत तीन जणांना जीव गमवावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख संदीप, नरेश आणि देवी चरण अशी झाली आहे, ते मोटाकोंडूर गावातील रहिवासी आहेत. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मोटाकोंडूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षकांनी सांगितले की, या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी कंपनीबाहेर निदर्शने केली आणि पीडितांना न्याय आणि भरपाईची मागणी केली. (हेही वाचा - Beed Mosque Blast Case: बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात UAPA लागू)

प्रीमियर एक्सप्लोसिव्ह्ज लिमिटेड ही भारताच्या प्रतिष्ठित क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी सॉलिड प्रोपेलेंट्स (क्षेपणास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा एक प्रकार) ची एक प्रमुख उत्पादक आहे. सॉलिड प्रोपेलेंट्स हे घन पदार्थ असतात जे नियंत्रित पद्धतीने जळून थ्रस्ट निर्माण करतात. स्फोटके अचानक, जलद विस्ताराने ऊर्जा सोडतात. रॉकेट इंजिनमध्ये थ्रस्ट निर्माण करण्यासाठी सॉलिड प्रोपेलेंटचा वापर केला जातो. तसेच ही स्फोटके बांधकाम, खाणकाम आणि युद्धासाठी वापरली जातात. (हेही वाचा - Cylinder Blast In Vikhroli: विक्रोळीत सिलेंडरचा स्फोट; आगीत होरपळून 2 जण जखमी (Watch Video))

अजमेर येथील कारखान्यात आग -

दुसऱ्या एका घटनेत मंगळवारी रात्री अजमेरमधील पालरा औद्योगिक क्षेत्रातील एका कागदाच्या कारखान्यात भीषण आग लागली होती. 15 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्यातील जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement