Cash for Query: TMC खासदार महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व संकटात, अहवाल सोमवारी लोकसभेत होणार सादर
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावरील 'कॅश फॉर क्वेरी' (Cash for Query) आरोपांबाबत संसदेच्या आचार समितीचा अहवाल 4 डिसेंबर रोजी लोकसभेत (Lok Sabha) मांडण्यात येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आचार समितीने स्वीकारलेल्या अहवालात तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेचे भाजप खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीने 9 नोव्हेंबर रोजी तृणमूल खासदाराविरुद्धचा अहवाल स्वीकारला आणि तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केला आहे. (हेही वाचा - PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार; राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण)
आचार समितीच्या सहा सदस्यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपाच्या अहवालाचे समर्थन केले, तर चार सदस्यांनी विरोध केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोईत्रा यांच्यावर शशिकांत दुबे यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतीकडून पैसे घेतले आहेत, असा दावा दुबे यांनी केला. हा दावा करत त्यांनी आयटीमंत्री अश्विनी वैष्णव तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन वेगवेगळी पत्रे लिहिली.