EPFO: पीएफ धारकांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी खात्यावर जमा होऊ शकते 8.5 टक्के व्याज, 6 कोटी लोकांना होणार फायदा
संघटना दिवाळीपूर्वी सदस्यांच्या खात्यावर 2020-21 (FY21) आर्थिक वर्षासाठी व्याज (Interest) जमा करू शकते. अहवालांनुसार, ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाने व्याज वाढीला मंजुरी दिली आहे आणि संस्था आता वित्त मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहत आहे.
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघटना दिवाळीपूर्वी सदस्यांच्या खात्यावर 2020-21 (FY21) आर्थिक वर्षासाठी व्याज (Interest) जमा करू शकते. अहवालांनुसार, ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाने व्याज वाढीला मंजुरी दिली आहे आणि संस्था आता वित्त मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. अहवालानुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि DR मध्ये वाढ होऊन अधिक पैसे मिळतील. 2020-21 साठी 8.5% व्याजदर देण्याबाबत अधिकाऱ्यांनी वित्त मंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे.
मार्चमध्ये बोर्डाने आर्थिक वर्ष 2021 साठी 8.5% पेआउटची शिफारस केली होती. EPFO ला गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 70,300 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, ज्यात त्यांच्या इक्विटी गुंतवणुकीचा काही भाग विकून सुमारे 4,000 कोटी रुपये समाविष्ट आहेत. 2020 मध्ये कोविड-19 च्या उद्रेकानंतर, ईपीएफओने मार्च 2020 मध्ये पीएफ व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला. गेल्या 7 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता, जो 2017-18 या आर्थिक वर्षात ते केवळ 8.55 टक्के होता. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी तो 8.5 टक्के आहे.
एकदा व्याज जमा झाल्यावर, पीएफ ग्राहक त्यांचे ईपीएफ शिल्लक आणि व्याज चा प्रकारे तपासू शकतात. ईपीएफ शिल्लक तपासण्यासाठी ग्राहकांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय असणे आवश्यक आहे.
ईपीएफओचे सदस्य एसएमएसद्वारे त्यांच्या ईपीएफ शिल्लकची माहिती घेऊ शकतात. यासाठी 7738299899 या क्रमांकावर, EPFOHO UAN ENG असा संदेश आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून पाठवा. एसएमएस प्राप्त झाल्यावर, ईपीएफओ त्या बदल्यात तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक तपशील पाठवेल. (हेही वाचा: Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन ब्लॉकचेन आदी गुंतवणूक किती सुरक्षीत? खरोखरच सुरक्षीत असतो आपला पैसा?)
EPFO शिल्लक तपासण्यासाठी मिस्ड कॉलची सुविधाही दिली आहे. अशावेळी तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन शिल्लक तपासू शकता. येथे आपला यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. EPFO सदस्य त्यांचे खाते शिल्लक आणि EPF स्टेटमेंट 'उमंग' या मोबाईल App द्वारे पाहू शकतात.