ED Files Case against BBC India: बीबीसी इंडिया विरुद्ध ईडीची कारवाई; FEMA अंतर्गत गुन्हा दाखल
FEMA हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा आहे जो परकीय चलनाचा इंफ्लो आणि आऊटफ्लो नियंत्रित करतो.
ईडी (Enforcement Directorate) कडून आज (13 एप्रिल) बीबीसी इंडिया (BBC India)वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीबीसी वर foreign exchange violation चा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान ईडी कडून कारवाईची ही पहिलीच वेळ नव्हे. फेब्रुवारी महिन्यातही बीबीसी च्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयावर केंद्रीय यंत्रणांवर कारवाई केली आहे. त्यावेळी बीबीसी इंडिया इन्कम टॅक्स विभागाच्या रडार वर होती. नक्की वाचा: Income Tax Raids On BBC Office: दिल्ली येथील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाकडून पाहणी, कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप, फोन जप्त केल्याचे वृत्त .
बीबीसी ही संस्था भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निगडीत एका डॉक्युमेंटरी मुळे चर्चेमध्ये आली होती. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या दंगली यावर या डॉक्युमेंटरी मध्ये भाष्य करण्यात आले आहे. Elon Musk on BBC Documentary Ban: भारतात बीबीसीची PM Narendra Modi यांच्यावरील डॉक्युमेंटरीच्या लिंक्स ट्वीटर वरून का हटवल्या? खुद्द एलन मस्क यांनी केला खुलासा.
पहा ट्वीट
ED ने Foreign Exchange Management Act (FEMA)च्या तरतुदींनुसार कागदपत्रे आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्डिंग मागवले आहे. एफडीआयच्या उल्लंघनासाठी बीबीसीची चौकशी केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
FEMA हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा आहे जो परकीय चलनाचा इंफ्लो आणि आऊटफ्लो नियंत्रित करतो.
फेब्रुवारी महिन्यातील सर्चनंतर, आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी बीबीसीच्या अकाऊंटिंग बूक मधून अनियमितता उघड केली. या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, समूहाच्या परदेशी संस्थांद्वारे भारतात उत्पन्न म्हणून जाहीर न केलेल्या काही रेमिटन्सवर कर भरला गेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
अद्याप बीबीसी ने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)