2019 च्या वर्षाअंती सोन्याचे दर 42 हजारांवर जाणार, भाववाढ मागील नेमके कारण जाणून घ्या
तर गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही सणासुदीच्या काळात सोन्याचे दर 40 हजार रुपयांच्या घरात पोहचल्याने सोने खरेदी करण्याच्या प्रमाणात घट झाली.
भारतीय समाजात सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणे बहुतांश वेळेस फायदेशीर मानले जाते. तर गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही सणासुदीच्या काळात सोन्याचे दर 40 हजार रुपयांच्या घरात पोहचल्याने सोने खरेदी करण्याच्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे विश्लेषकांचे असे मानणे आहे की, 2019 च्या वर्षाअंती सोन्याचे दर 42 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचणार आहेच. जिओपॉलिटिकल टेंन्शन, आरबीआय च्या माध्यमातून सोने खरेदी आणि किंमतीमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसचे प्रमुख किशोर नारने यांनी असे सांगितले की, 2019 मध्ये सोन्याच्या किंमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची विक्री गेल्या काही वर्षांपेक्षा कमी झाली असली तरीही या किंमती वाढत राहणार आहे. तसेच व्यापार युद्धामुळे ही सोन्याचे भावात काही सुधारणा होऊ शकतात. अशी आशा आहे की 39,500 रुपयांच्या वर पुढील वर्षभरात सोन्याचा दर 41,500 रुपयांपेक्षा अधिक होणार आहे.(मोदी सरकार नोटबंदी सारखा अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेणार, घरात ठेवलेल्या सोन्याच्या ऐवजांची माहिती सरकारला द्यावी लागणार)
एमके वेल्थ मॅनेजमेंटचे रिसर्ज प्रमुख डॉ. के जोसेफ थॉमस यांनी असे म्हटले की, सोन्यात गुंतवणूक हा उत्तम पर्याय मानला जातो. परंतु जर तुम्ही गेल्या 5 वर्षाबाबत विचार केल्यास सोन्याचे रिटर्न 7 टक्के सीएजीएआर राहिले आहे. सध्या सोन्याचे भाव 1480 ते 1510 स्तरावर आहे. त्याचसोबत सध्याची वैश्विक आर्थिक सुस्ती, अमेरिका चीन मधील व्यापार युद्ध आणि जिओपॉलिटिकल टेंन्शनच्या कारणामुळे सोन्याचे दरात वाढ झाली आहे.