Modi Ka Parivar Vs Electoral Bonds: इलेक्टोरल बॉन्ड मोदी का परिवार? पंतप्रधानांनी 'X' वर शेअर केलेल्या व्हिडिओवर टीकेचा भडीमार

Modi Ka Parivar Vs Electoral Bond | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये 'इलेक्टोरल बॉन्ड' (Electoral Bond) ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीवाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर भाजपने त्याबाबत मोहीमच सुरु केली. 'मोदी का परिवार' (Modi Ka Parivar) असे म्हणत निवडणूक मोहिम हाती घेतलेल्या भाजपला आता भ्रष्टाचारावरुन प्रश्न विचारले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (16 मार्च) 'X' (पुर्वीचे ट्वीटर) हँडलवर एक व्हडिओ पोस्ट केला आहे. ज्याला त्यांनी 'मेरा भारत, मेरा परिवार!' असे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान हे सर्वसामान्य जनतेची कशी काळजी घेतात, लोकांमध्ये मिसळतात याबाबत अनेक दृश्ये दाखविण्यात आली आहेत. त्यावरुनच नेटीझन्सनी जोरदार टीका केली आहे. तसेच, व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रियांमध्ये भ्रष्टाचार आणि इलेक्टोरल बॉन्ड यांवरुन प्रश्न विचारले आहेत.

मोदींनी शेअर केलेला व्हिडिओ

पंतप्रधानांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओखाली निलेश शेकोकर नावाच्या वापरकर्त्याने @nileshshekokar या हँडलवरुन मोदी का परिवार आझाद भारत का सबसे बडा घोटाला असे म्हणत एक इलेक्ट्रोल बॉन्डची आकडेवारी आणि प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तांचा दाखला दिला आहे. शिवाय, त्याच पोस्टमध्ये 'मोदी की चोरी का इससे बडा सबूत मिल नही सकता', असे म्हटले आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Dates: लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर; जाणून घ्या ECI कधी घेणार पत्रकार परिषद)

एक्स पोस्ट

मणीपुर तुमचा परिवार नाही काय?

सुप्रिया मारादीया नावाच्या वापरकर्त्याने @SurabhiMaradiya या ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे की, जर भारतातील प्रत्येक व्यक्ती आपला परिवार असेल तर मणिपूरमधील जनतेसोबत आपण का नाही उभे राहिलात? देशातील दलितांना भाजपशासीत राज्यांमध्ये मारहाण होते, तेव्हा आपण त्यांच्यासोबत का नाही उभे राहात? मुस्लीम नागरिकांना मारहाण होते तेव्हा आपण त्यांच्यासोबत का नाही उभे राहात? जर आपण यांच्यासोबत उभे राहत नाही, याचा अर्थ तुम्ही नविडणुका जिंकण्यासाठी नाटक करत आहात, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आले आहे. (हेही वाचा, Electoral Bond Case: निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका, उद्यापर्यंत माहिती सर्व देण्याचे आदेश)

एक्स पोस्ट

मोदी आणि भाजप हाच देशासाठी मोठा अभिशाप

महेश नावाच्या वापरकर्त्याने @the_mighty_mr या एक्स हँडलवरुन बलात्कारी जाहील पार्टी असे म्हणत काही भाजप नेत्यांचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ब्रिजभूषण शरणसिंह, कुलदीप सेंगर, साक्षी महाराज, एम जे अकबर, निहाल चंद, संदीप सिंह, आरएन त्रीपाठी, रामदुलार गौर, एक बिंदी, राघवजी, डीएन जीवनराज, विजय जॉली, अशोक माखना, जयेश पटेल, मधू चव्हाण, अनिल भोसले, आर बावनतडे, रमेश गुलहाने, संथल सोलंखी यांच्या नावाचा समावेशआहे. मोदी भाजप हाच देशासाठी एक मोठा अभिशाप असल्याचेही या अकाऊंटवरुन म्हटले आहे.

एक्स पोस्ट

अभिमन्यू सिंह जर्नालिस्ट नावाच्या वापरकर्त्याने @Abhimanyu1305 नावाच्या एक्स हँडलवरुन 'लेकिन मेरे भारत से ज्यादा आप महान हैं। इलेक्ट्रोरल बांड जैसे कार्य करके।', असे म्हणत मोदी का परिवार मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

एक्स पोस्ट

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या परिषदेत देशातील लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला जाणार आहे.