Rahul Gandhi On Election Commission: 'ECI ने चांगला निर्णय घेतला, पण आम्हाला डेटा कधी मिळणार...'; राहुल गांधींचा पुन्हा निवडणूक आयोगाला प्रश्न

राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक आयोगाला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी कधी उपलब्ध करून देणार आहेत? असा प्रश्न केला होता. तथापी, निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी 2009 ते 2024 पर्यंतच्या मतदार यादीचा डेटा शेअर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

Rahul Gandhi On Election Commission: 'ECI ने चांगला निर्णय घेतला, पण आम्हाला डेटा कधी मिळणार...'; राहुल गांधींचा पुन्हा निवडणूक आयोगाला प्रश्न
Rahul Gandhi | (Photo Cedit - X)

Rahul Gandhi On Election Commission: गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक आयोगाला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी कधी उपलब्ध करून देणार आहेत? असा प्रश्न केला होता. तथापी, निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी 2009 ते 2024 पर्यंतच्या मतदार यादीचा डेटा शेअर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये राहुल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मतदार यादी सोपवणे हे निवडणूक आयोगाने उचललेले पहिले चांगले पाऊल आहे. निवडणूक आयोग हा डेटा कोणत्या तारखेपर्यंत सोपवला जाईल याची नेमकी तारीख जाहीर करू शकेल का?'

राहुल गांधींनी शेअर केला स्क्रीनशॉट -

दरम्यान, राहुल गांधींनी ट्विटरवर एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करताना हा प्रश्न विचारला आहे. स्क्रीनशॉटमध्ये दावा करण्यात आला आहे की निवडणूक आयोगाने 2009 ते 2024 पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी मतदार यादीचा डेटा शेअर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यात म्हटले आहे की निवडणूक आयोगाने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात आश्वासन दिले होते. तथापि, या कथित हालचालीबद्दल निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. (हेही वाचा -Rahul Gandhi On Election Commission Reply: ‘महाराष्ट्रातील मतदान केंद्रांचे CCTV फुटेज जारी करा’; राहुल गांधी यांचे निवडणूक आयोगाच्या प्रत्युत्तर)

राहुल गांधींचा पुन्हा निवडणूक आयोगाला प्रश्न -

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी हेराफेरीचा आरोप केला होता. यावर, निवडणूक आयोगातील सूत्रांनी रविवारी सांगितले की, विरोधी पक्षनेते अधिकृतपणे लिहितील तेव्हाच संवैधानिक संस्था प्रतिसाद देईल. त्यांनी असेही सांगितले की, वाढत्या संपर्काचा एक भाग म्हणून, निवडणूक आयोगाने सर्व सहा राष्ट्रीय पक्षांना स्वतंत्र चर्चेसाठी आमंत्रित केले होते. पाच पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, परंतु काँग्रेसने 15 मे रोजी ही बैठक रद्द केली. (हेही वाचा - CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'याचा अर्थ राहुल गांधींनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे...', महाराष्ट्र निवडणूक हेराफेरीच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)

राहुल गांधी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळले. यानंतर, राहुल गांधींनी शनिवारी पुन्हा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आणि म्हटले की त्याची विश्वासार्हता चोरीने नव्हे तर सत्याने जपली जाईल. राहुल गांधींनी महाराष्ट्र निवडणुकीत 'मॅच-फिक्सिंग'चा आरोप केला होता आणि असा दावा केला होता की, आगामी बिहार निवडणुकीत देखील असेच घडेल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 5185 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).