Donald Trump India Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आजपासून भारत दौरा; अहमदाबाद येथे काटेकोर बंदोबस्तासह जय्यत तयारी

या दौऱ्यात त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर हे देखील सहभागी होणार आहेत.

Narendra Modi & Donald Trump (Photo Credit: Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची पत्नी मेलानिया (Melenia Trump), मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर हे देखील सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर व्हाईट हाऊस मधील दोन प्रमुख सल्लागार देखील यावेळी ट्रम्प यांच्यासोबत असणार आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. तसंच सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवली जाणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण रस्त्याची सॅटेलाईट स्क्रीनिंगही केली जाणार आहे. ट्रम्प कुटुंब भारतात आल्यानंतर प्रत्येक क्षणाला 5 टिअर सुरक्षा असणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. (डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी 'बुखारा' रेस्टॉरंट मध्ये साकारण्यात येतंय खास 'Trump Platter'; गुजराती शाकाहारी पदार्थांची पर्वणी चाखणार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष)

ट्रम्प यांच्या आगमनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांचे अहमदाबाद येथील विमानतळावर स्वागत करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचे होर्डिंगस रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. (डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील 24 आणि 25 फेब्रुवारी या दोन्ही दिवसांचे संपूर्ण शेड्युल जाणून घ्या)

ANI Tweet:

ANI Tweet:

ट्रम्प यांच्या भेटीनिमित्त मोटेरा स्टेडियमच्या परिसरात काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ANI Tweet:

नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियमवर करण्यात आलेली जय्यत तयारी.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारतीय दौरा असून या दौऱ्यात ट्रम्प आणि मोदींची सुमारे दीड तास बैठक होणार आहे. ट्रम्प अहमदाबादमध्ये असेपर्यंत त्यांच्या कार्यक्रम स्थळाच्या आपसपास नो फ्लाईंग झोन असणार आहे. मोटेरो स्टेडिअमधील कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची वैयक्तिक तपासणी होणार आहे. तसंच या परिसरात पोलिसांच्या वाहनाशिवाय कोणत्याही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही.