Donald Trump India Visit: 'भारतात येणे ही सन्मानाची गोष्ट', अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हैदराबाद हाऊसमध्ये प्रतिक्रिया
तर सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद ते ताजमहाल पर्यंत जोरदार तयारी करण्यात आली होती. तसेच मोटेरा स्टेडिअमवर सुद्धा लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत त्यांचे स्वागत केले.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा आज भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. तर सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद ते ताजमहाल पर्यंत जोरदार तयारी करण्यात आली होती. तसेच मोटेरा स्टेडिअमवर सुद्धा लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत त्यांची भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे सुद्धा कौतुक केले. तर आज डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत दौऱ्यावर आले आहेत. याच पार्श्वभुमीवर हैदराबाद हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर येणे ही सन्मानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, मोटेरा स्टेडिअमवरील स्वागत हे माझ्यासाठी अविस्मरणीय होते. माझ्यापेक्षा तुमच्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती लावली होती. 125 हजार लोक तेथे होते आणि ज्या ज्यावेळी मी तुमचे नाव घेतले त्यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला. येथील लोक तुमच्यावर खुप प्रेम करतात असे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.(दिल्ली: डोनाल्ड ट्र्म्प आणि मेलानिया ट्र्म्प यांच्याकडून 'भारत-अमेरिका' मैत्रीचं प्रतिक म्हणून राजघाटावर वृक्षारोपण; महात्मा गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन)
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबबात प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबाद हाउसध्ये मोदी यांनी असे म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आभार मानतो. मला माहिती आहे सध्या तुम्ही व्यस्त आहात. तरीही वेळात वेळ काढून तुम्ही भारत दौऱ्यावर आल्याने मी तुमचे आभार मानतो.
तर आज डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी प्रथम भाराताच्या राष्ट्रपती भवनाला भेट दिली. त्यानंतर भारत आणि अमेरिकन शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळेस 21 तोफांच्या सलामीसोबत भारतीय सैन्य दलाकडून डोनाल्ड ट्र्म्प आणि मेलानिया ट्र्म्प यांचं जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ट्र्म्प दांपत्य महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी राजघाटावर पोहचले. तेथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळेस भारत- अमेरिका मैत्रीचं प्रतिक म्हणून त्यांना वृक्षारोपणदेखील केले.