Diwali 2019:जम्मू- काश्मीर मध्ये सैनिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरी केली दिवाळी; पहा हे खास क्षण (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra MOdi) यांनी आज जम्मू- काश्मीर (Jammu- Kashmir) येथील लाईन ऑफ कंट्रोलवरील (LOC) सुरक्षा रक्षकांसोबत दिवाळी साजरी केली.
आजपासून देशभरात दिवाळीचा (Diwali) जल्लोष पाहायला मिळत आहे, सणाच्या दिवशी आपले नातेवाईक, मित्रपरिवारासोबत मिळून सेलिब्रेशनची मजाच काही और असते मात्र दरवर्षी देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिक या आनंदाला मात्र मूकतात. कर्तव्याच्या बजावणीसाठी स्वतःच्या आनंदला बाजूला ठेवतात. या सैनिकांना निदान काही क्षण तरी सणाची मजा लुटता यावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra MOdi) यांनी आज जम्मू- काश्मीर (Jammu- Kashmir) येथील लाईन ऑफ कंट्रोलवरील (LOC) सुरक्षा रक्षकांसोबत दिवाळी साजरी केली. आज सकाळी दहा वाजताच नरेंद्र मोदी यांनी आर्मी प्रमुख बिपीन रावत (Bipin Ravat) यांच्या समवेत जाऊन राजौरी (Rajouri) येथील मुख्यालयाला भेट दिली. याठिकाणी पोहचातच मोदी यांनी सर्वात आधी सीमेवरील सुरक्षेची विचारपूस करत नंतर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यावर काही वेळ सैनिकांसोबतच वार्तालाप केला. "देशातील सुख शांतीचे श्रेय सैनिकांना जाते, आज दिवाळीच्या निमित्तानं एप्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत मिळून आनंद साजरा करतो त्याच प्रमाणे परंपरेला धरून मी सुद्धा माझ्या कुटुंबाकडे आलेलो आहे, तुम्ही सैनिकच माझे कुटुंब आहेत" असे म्हणत मोदींनी सैनिकांची आभार मानले. या खास क्षणाचे काही खास फोटो आणि व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा हे खास फोटो आणि व्हिडीओ
दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मधील यंदाची दिवाळी खास मानली जात आहे. किंबहुना म्ह्णूनच मोदींच्या या दिवाळी विशेष व्हिजिटचे कौतुक होत आहे. याआधी सुद्धा 2014 साली निवडून आल्यावर तर 2015 , 2016 आणि 2017 साली देखील मोदींनी जवानांच्या सोबत दिवाळी सेलिब्रेट केली होती. आज सकाळचा हा कार्यक्रम उरकल्यांनंतर मोदींनी पार्टीच्या वाटेत येताना पठाणकोट येथील नव्याने स्थापन केलेल्या हेलिकॉप्टर बेस ला देखील भेट दिली.
.