'Flying Beast' Pilot Gaurav Taneja Case: वैमानिक गौरव तनेजा ने उपस्थित केलेल्या सुरक्षा नियमांवरील आरोपांनंतर DGCA करणार AirAsia India ची चौकशी

Flying Beast या त्याच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी त्याने एअर एशिया इंडिया कंपनीच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कामावरून काढून टाकल्याचं त्याने सांगितलं आहे.

एयर एशिया (Photo Credits-ANI Twitter)

AirAsia India या खाजगी विमान कंपनीच्या एका वैमानिकाने केलेल्या आरोपांनंतर आता DGCA या यंत्रणेकडून आता त्याच्या विमान कंपनची चौकशी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या वैमानिक एक युट्युबर देखील आहे. Flying Beast या त्याच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी त्याने एअर एशिया इंडिया कंपनीच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कामावरून काढून टाकल्याचं त्याने सांगितलं आहे. गौरव तनेजा असं या वैमानिकाचं नाव असून त्याने ट्वीट आणि सविस्तर व्हिडिओ पोस्ट केल्याने मागील काही दिवसांपासून हे प्रकरण सोशल मीडियामध्ये चांगलच गाजत आहे.

गौरवने त्याच्या युट्युब चॅनलवर "Reasons behind suspension from my pilot job" या हेडिंगखाली एक व्हीडिओ पोस्ट करत सारा प्रकार सांगितला आहे. दरम्यान त्याने केलेल्या आरोपांनुसार एअर आशियाने त्यांच्या वैमानिकांना 98% विमानांचं लॅन्डिंग हे Flap 3 मोडमध्ये करण्याचे आदेश दिले होते. यामुळे विमानाचं इंधन वाचवता येईल. जे वैमानिक फ्लॅप 3 मध्ये लॅन्डिंग करू शकत नाहीत ते विमान कंपन्यांच्या नियमांचं उल्लंघन करतात असे गौरव म्हणतो. इथे सविस्तर पहा काय आहे नेमकं गौरवं म्हणणं? 

फ्लॅप 3 मधील लॅन्डिंग प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही? हे पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान अशा लॅन्डिगमध्ये काही अपघात झला तर त्याची जबाबदारीदेखील वैमानिकावर येणार. मग अशावेळेस प्रवाशांचा जीव की विमानाचं इंधन नेमकं काय वाचवणं गरजेचे आहे? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

सोमवारी गौरव तनेजाने आपली बाजू मांडण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच ट्विटर वर #BoyCottAirAsia हा हॅशटॅगदेखील ट्रेंड झाला होता. कोरोना संकटकाळातही एअर एशियाकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचं त्याने म्हटलं आहे.