Depression, Murders, Suicide: नैराश्येतून पत्नी मुलीची हत्या नंतर आत्महत्या, डॉक्टर कटुंबातील चौघांचा मृत्यू

ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली येथील रेल्वे वसाहतीमध्ये घडली.

Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतीय रेल्वेत (Indian Railways) नोकरीला असलेल्या एका डॉक्टरने पत्नी आणि मुलांची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली येथील रेल्वे वसाहतीमध्ये घडली. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, रायबरेली येथील मॉडर्न रेल कोच फॅक्टरीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नेत्रतज्ज्ञ डॉ. अरुण कुमार हे नैराश्याने (Depression) ग्रासले होते. या नैराश्येतून त्यांनी कुटुंबासह स्वत:लाही संपवले.

दोन दिवस हे कुटुंब बेपत्ता

डॉ. कुमार हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह मिर्झापूर येथील रेल्वे कॉलनीत राहात होते. कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना हे कुटुंब रविवारी अखेरचे दिसले. त्यानंतरचे दोन दिवस हे कुटुंब बेपत्ता होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचाही संपर्क त्यांच्याशी होऊ शकला नाही. दरम्यान, डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट दिली तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यावरुन संशय आल्याने सोसायटीतील ग्रामस्थ आणि पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर डॉ. कुमार, त्यांची पत्नी अर्चना, मुलगी आदिवा (12), मुलगा आरव (4) यांचे मृतदेह आढळून आले. (हेही वाचा, Palghar: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; पालघर येथील घटना, आरोपी पतीला अटक)

गुन्ह्याच्या ठिकाणी हातोडा, रक्ताचे डाग आणि अंमली पदार्थांचे इंजेक्शन

पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी हातोडा, रक्ताचे डाग आणि अंमली पदार्थांचे इंजेक्शन सापडले. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, डॉ. कुमारने त्यांच्या डोक्यात प्राणघातक वार करण्याआधी त्यांच्या कुटुंबीयांना ड्रग्ज दिले, त्यांना बेशुद्ध केले. शेवटी फाशी घेण्यापूर्वी डॉक्टरांनी मनगट कापून स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला. रायबरेलीचे एसपी आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती पुढे येशू शकेल. (हेही वाचा, Thane Shocker: पैशासाठी नवऱ्याने दाबला बायकोचा गळा, मृतदेह पिंपात भरुन अंबनाथच्या जंगलात फेकला; टिटवाळा येथील घटना)

 शेजारी आणि कॉलनीतील अनेकांना धक्का

डॉ. कुमार यांच्या आत्महत्येने शेजारी आणि कॉलनीतील अनेकांना धक्का बसला आहे. सर्वांनीच डॉ. कुमार यांचे वर्णन मनमिळावू आणि हसतमुख फॅमेली असे केले आहे. शेजारी राहणाऱ्या कमल कुमार दास यांनी म्हटले की, डॉ. कुमार आणि त्यांचे कुटुंबीय आमच्याशी नेहमीच आनंदी आणि आदराने वागत असायचे. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत कलह किंवा काही इतर समस्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे. पण, त्यांच्यातील कलह आम्हाला केव्हाच जाणवला नाही, असेही ते म्हणाले. लखनौ रेंजचे आयजी तरुण गौबा यांनी म्हटले की, शेजारी आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नोंद घेतली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या त्यापाठिमागचे नेमके कारण काय याबाबत सविस्तर माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यावर आणि तपास पूर्ण झाल्यावर पुढे येऊ शकेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif