Palghar: पालघरमध्ये एका 35 वर्षीय आदिवासी व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय ब्राम्हणे यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले की, या व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या (Murder) केल्याचा आरोप आहे. जव्हार तालुक्यातील खिरोडा गावात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. संशयिताने आपल्या पत्नीवर (वय 32) हल्ला करण्यासाठी धारदार शस्त्राचा वापर केला, ज्यामुळे तिचा तत्काळ मृत्यू झाला.
अहवालानुसार, सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करून भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Latur Crime News: पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली तरुणाची हत्या, लातूर येथील घटना)
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत ठाणे जिल्ह्यात गर्लफ्रेंडच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कलम 324 (एखादे धोकादायक शस्त्र किंवा साधन वापरून स्वेच्छेने दुखापत करणे) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना 11 नोव्हेंबर रोजी पाचपाखाडी भागात घडली. आरोपी पीडितेच्या घरी आला आणि त्याने तिच्याशी भांडण केले. आरोपीने महिलेला लाथ मारून बेदम मारहाण केली. पीडितेने अलार्म वाजवताच, तिच्या शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि तिला रुग्णालयात नेले.