Mumbai Crime: लग्नाचे आमिष दाखवून हुंड्याची मागणी, तरुणीवर बलात्कार, व्यवसायिकेवर गुन्हा दाखल

मध्य प्रदेशातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच हुंड्याची मागणी करून पीडितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Representative Image

Mumbai Crime: मध्य प्रदेशातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच हुंड्याची मागणी करून पीडितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये आरोपीच्या आई वडिल आणि बहिणीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. आरोपी एक व्यवसायक आहे. मुंबईत कपड्यांचा व्यवसाय आहे. (हेही वाचा- हैदराबादमध्ये 'धार गँग'ची दहशत, पोलिसांनी जारी केला हाय अलर्ट (पहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सागरी जिल्ह्यातील मेहर येथील तरुणीची मेट्रोमेनी वेबसाइटद्वारे उज्वल गोयंकाची ओळख झाली. दोघांन्ही लग्न करायचे ठरवले. दोघांचा साखरपूडा झाला. काही दिवसांनंतर उज्वलने तरुणीला घरी बोलवले तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतक लोणावळ्यतील एक रिसॉर्टमध्ये घेऊन गेला तेथे तिच्यावर बलात्कार केला. लग्न करण्यासाठी त्याने हुंडा मागिलता. आरोपीने लग्नाची तारीख सतत पुढे ढकलली.

लग्नाच्या काही दिवसांपूर्वी त्याने ५० लाख रोख आणि २५ लाख किमतीची चारचाकी मागितली. तरुणीच्या कुटुबांनी कसे तरी ५ लाख रुपये दिले. दिवसेदिंवस त्यांच्या मागण्या वाढत राहिल्या. या वर्षी मे महिन्याच्या अखेरेच उज्वलने दुसऱ्या महिलेशी लग्न केले असं समजले. या घटनेनंतर तरुणीला धक्काच बसला. महिलेने हुंडा मागितला परंतु त्याने एकही रुपया दिला नाही. त्यानंतर तरुणीने वरळी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीवर हुंडा बळी, बलात्कार आणि फसवणूक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्या आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस त्याच्या शोधात आहे. कोर्टाकडून आरोपीच्या आई वडिलांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement