ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे निधन
सध्या ते राष्ट्रीय जनता दलाकडून राज्यसभेवर खासदार होते.
ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी (Ram Jethmalani) यांचे आज (8 सप्टेंबर) निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी दिल्लीमध्ये त्यांचे निधन झाले आहे. राम जेठमलानी वकील आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार देखील होते. त्यांची ओळख प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणूनही होती. मागील काही दिवसांपासून राम जेठमलानी आजारी होते. राम जेठमलानी यांनी राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींसोबतच चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांची देखील केस लढवली आहे. याप्रमाणेच संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू ते सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील अमित शहा यांची केस राम जेठमलानी यांनी लढवली आहे.
राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 साली पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे झाला. वयाच्या 17 व्या वर्षी राम जेठमलानी यांनी वकील म्हणून पदवी मिळवली होती. वयाच्या 18 व्या वर्षापासून त्यांना वकिलीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र कायद्यानुसार वयाच्या 21 वर्षांपासून प्रॅक्टीस सुरू करता येते असा नियम होता. जेठमलानी यांनी 7 दशकं वकीली केली. त्यानंतर त्यांनी 2017 साली त्यांनी वकिलीच्या व्यवसायातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. मात्र भ्रष्ट नेत्यांविरोधात लढाई कायम ठेवणार अशी घोषणा केली होती. Ram Jethmalani Dies: पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्या सह दिग्गजांकडून राम जेठमलानी यांना श्रद्धांजली; अमित शहा यांनी घेतले राहत्या घरी अंतिम दर्शन.
ANI Tweet
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये राम जेठमलानी यांनी केंद्रीय कायदा मंत्री म्हणून पद भूषवले होते. त्यानंतर पक्षातून 6 वर्षांसाठी हाकलपट्टी करण्यात आली होती. त्यावेळेस जेठमलानी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधातच निवडणूक लढवण्यास मैदानात उतरले. सध्या ते राष्ट्रीय जनता दलाकडून राज्यसभेवर खासदार होते.