Delhi: मोदीजी आमच्या मुलांची कोरोनाची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टरबाजी करणाऱ्या 15 जणांना अटक तर 17 लोकांच्या विरोधात FIR दाखल

दिल्ली पोलिसांनी 19 च्या विरोधातील लसीकरण अभियानासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीका करणारे पोस्टर लावण्यात आल्याने 17 जणांच्या विरोधात एफआयआर तर 15 जणांचा अटक करण्यात आली आहे.

Vaccine (Photo Credits-Twitter)

Delhi: दिल्ली पोलिसांनी 19 च्या विरोधातील लसीकरण अभियानासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीका करणारे पोस्टर लावण्यात आल्याने 17 जणांच्या विरोधात एफआयआर तर 15 जणांचा अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी असे म्हटले की, मोदीजी, आमच्या मुलांची कोरोनाची लस विदेशात का पाठवली? अशी विचारणा करणारे पोस्टर शहरातील काही भागात लावण्यात आले. याबद्दल पोलिसांना सुचना मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले. तक्रारीनुसार, दिल्ली पोलिसांनी विविध जिल्ह्यात 17 एफआयआर दाखल केले आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, या संबंधित आणखी काही तक्रारी समोर आल्यास तर एफआयआर दाखल करण्यात येणार आहेत. सध्या हे पोस्टर कोणी लावले याचा तपास केला जात असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तीन एफआयआर पश्चिम दिल्ली आणि तीन एफआयर दिल्ली बाहेरील आहेत. पोस्टरवर कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाव लिहिण्यात आलेले नाही. पण काळ्या रंगाचे हे पोस्टर्स असून वेगाने सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.(गोव्यातील जीएमसीएच मध्ये गेल्या 4 दिवसात 75 रुग्णांचा मृत्यू, 'या' पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल)

Tweet:

पोलिसांनी असे म्हटले की, उत्तर दिल्लीत दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मधील एका व्यक्तीने म्हटले की, त्याला तीन पोस्टर लावण्याचे 500 रुपये दिले गेले होते. आणखी एक प्रकरण शाहदरा येथे दाखल केला असून पोलिसांनी घटने संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता त्यामध्ये दिसून आलेल्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे.