Delhi Pollution Crisis: दिल्लीचा श्वास कोंडलेलाच! AQI 'गंभीर श्रेणी' मध्ये, शाळांना सुट्टी, वर्ग ऑनलाईन सुरु

नोएडातील शाळांमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय 25 नोव्हेंबर रोजी घेणार जीआरएपी-4 निर्बंधांचा आढावा.

Delhi Pollution | (Photo Credit - ANI)

राजधानी दिल्ली (Delhi Pollution) अद्यापही दाट धुके आणि धुरके यांच्या धरामुळे व्यापून गेली आहे. 'अत्यंत खराब' श्रेणीत पोहोचलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI Levels) आणि त्यात भर घालणारी धूर सोडणारी वाहने, उद्योग आणि इतर घटक यांमुळे शहराचा श्वास घुसमटला आहे. दिल्लीतील वायूप्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारी आव्हाने निपटण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन यांच्याकडून उपाययोजना अद्यापही सुरुच आहे. ज्यामुळे शाळांतील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थितीती अजूनही टाळण्यात येत आहे. शाळांना ऑनलाईन वर्ग (Online Classes) भरविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील वायूप्रदुषण विचारात घेऊन नोएडातील सर्व शाळांना 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या धोकादायक गुणवत्तेच्या पातळीचे अनुसरण करतात. (हेही वाचा, Air Pollution Hamper Children Learning: वायुप्रदूषणाचा मुलांच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम; अमेरिकन विद्यापाठीच्या अभ्यासात समोर आली माहिती)

हवेची गुणवत्ता खालावल्याने नोएडातील शाळा ऑनलाईन

गौतम बुद्ध नगरमध्ये गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावत भरणारे वर्ग आधीच स्थगित करण्यात आले होते. जिल्हा शाळा निरीक्षक (डीआयओएस.) धरमवीर सिंग यांनी दिलेल्या ताज्या निर्देशामध्येही इतर शाळांना अशाच प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्देशांमध्ये "दिल्ली-एनसीआरमधील एक्यूआय गंभीर श्रेणीत (450) प्रवेश करत असल्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्व-शाळेपासून ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग 25 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. शाळांनी 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे', असे म्हटले आहे. (हेही वाचा, Lahore Smog Crisis Deepens: लाहोरमध्ये विषारी हवा, धुक्याने घुसमटले नागरिकांचे श्वास; एका दिवसात 15,000 हून अधिक प्रकरणे नोंद, NASA ने टिपाला फोटो)

वाढत्या प्रदूषणामुळे रहिवाशांची चिंता वाढली

हवेची गुणवत्ता खालावत असल्याबद्दल रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. एका स्थानिक रहिवाशाने पीटीआयशी बोलताना म्हटले की, प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत आहे. जे सकाळी फिरायला जातात त्यांच्यासाठी हे विशेषतः चिंताजनक आहे, कारण धोकादायक हवेच्या संपर्कात आल्याने आरोग्यास लक्षणीय हानी पोहोचू शकते .  (हेही वाचा, Air Pollution in India: वाढते वायू प्रदूषण भारतासाठी आव्हान; देशातील 10 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्याने दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू)

दिल्लीतील एक्यूआयची पातळी गंभीर पातळीवर

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 4 वाजता दिल्लीचा सरासरी एक्यूआय 412 होता. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, 17 देखरेख केंद्रांनी हवेची गुणवत्ता 'गंभीर' नोंदवली, वझीरपूरमध्ये सर्वाधिक एक्यूआय 440 नोंदवला गेला.

रविवारी (24 नोव्हेंबर) सकाळी, एक्यूआयची खालील पातळी नोंदवली गेलीः

जीआरएपी-4 निर्बंधांचा सर्वोच्च न्यायालय करणार आढावा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन-4 (जीआरएपी-4) निर्बंधांच्या शिथिलतेचा आढावा घेण्यास सहमती दर्शविली आहे. अलीकडच्या काळात हवेची गुणवत्ता जी. आर. ए. पी.-2 टप्प्यापर्यंत किंचित सुधारली आहे, असा दावा वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सी. ए. क्यू. एम.) केला आहे.

सकाळी चालणाऱ्या लोकांसाठी त्रासदायक स्थिती

न्यायमूर्ती A.S. Oka यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, हा निर्णय 13 न्यायालयीन आयुक्तांनी राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील सीमा प्रवेश बिंदूंच्या क्षेत्रीय भेटींनंतर सादर केलेल्या अहवालांवर अवलंबून असेल.

दिल्लीतील प्रदूषणाचे संकटः तातडीने कारवाईची मागणी

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीने वारंवार येणाऱ्या हवेच्या गुणवत्तेच्या संकटाचा सामना करण्यासाठी शाश्वत उपायांची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या भागात दिलासा देण्यासाठी परिस्थिती बदलेल अशी आशा अधिकारी आणि रहिवासी दोघांनाही आहे.