IPL Auction 2025 Live

दिल्लीत घातक हवेमुळे हेल्थ इमर्जेंसी लागू, नागरिकांना आरोग्यासंबंधित काळजी घेण्याचे आवाहन

त्यामुळे आता येथील लोकांना श्वास घेण्यासाठी सुद्धा पोहचला आहे. याच कारणामुळे दिल्लीत घातक हवेमुळे हेल्थ इमर्जेंसी लागू करण्यात आली आहे. तसेच येत्या 5 नोव्हेंबर पर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Delhi Air Pollution control Measures | (Pic Courtesy: PTI)

दिल्ली एनसीआर मध्ये हवेच्या गुणवत्ता निर्देशांक भयानक स्तरावर पोहचला आहे. त्यामुळे आता येथील लोकांना श्वास घेण्यासाठी सुद्धा पोहचला आहे. याच कारणामुळे दिल्लीत घातक हवेमुळे हेल्थ इमर्जेंसी लागू करण्यात आली आहे. तसेच येत्या 5 नोव्हेंबर पर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.ही बंदी फक्त सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लावण्यात आली होती. मात्र आता प्रदुषणाचे प्रमाण अधिक वाढल्याने शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत नागरिकांना  आरोग्यासंबंधित काळजी घेण्याचे आवाहन

प्रदुषणामुळे ईपीसीएने दिल्ली एनसीआर मध्ये हेल्थ इमर्जेंसी लागू केली आहे. त्याचसोबत बांधकाम पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे. ईपीसीए ही सुप्रीम कोर्टाची एक कमेटी आहे. बांधाकामावर ही 5 नोव्हेंबर पर्यंत बंदी लागू राहणार आहे. ईपीसीए यांच्या मते दिल्ली एनसीआर मधील प्रदुषणाचा स्तर हा प्लस कॅटरेगरीमध्ये पोहचला आहे.

अरविंद केजरीवाल ट्वीट: 

ईपीसीएने दिल्ली, हरियाणा आणि युपी मधील मुख्य सचिवांना पत्र लिहित हवेच्या प्रदुषणावर तोडगा काढण्यास सांगितले आहे.  याचे मुख्याधिकारी यांनी असे म्हटले आहे की, दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत खुप घट झाली असून तो गंभीर स्तरावर पोहचला आहे. त्यामुळे ही स्थिती पब्लिक हेल्थ एमर्जेंसीच्या रुपात घेणे महत्वाचे आहे. कारण यामुळे खासकरुन लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची फार शक्यता आहे.

त्याचसोबत ईसीपीएने असे ही म्हटले आहे की, सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने संपूर्ण थंडीच्या दिवसात सुद्धा फटाक्यांवर बंदी कायम राहणार आहे. कारण खुप प्रयत्न करुन ही फटाके वाजवण्यात आले आहेत. त्यामुळेच हवेतील प्रदुषणाचे प्रमाण अधिकाधिक वाढले गेल्याचे दिसून आले आहे.