Delhi IED Blast: इज्राईल दूतवासाजवळ झालेल्या स्फोटाबद्दल मोठा खुलासा, 'हा फक्त ट्रेलर' असल्याचे लिहिले होते पत्रात

राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये इज्राईलच्या दूतवासाजवळ (Israel Embassy) शुक्रवारी मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. ज्यामध्ये दोन लोक कारमधून बाहेर येत दूतवासाकडे जात असल्याचे दिसून आले.

दिल्ली स्फोट (Photo Credits-ANI Twitter)

Delhi IED Blast: राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये इज्राईलच्या दूतवासाजवळ (Israel Embassy)  शुक्रवारी मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. ज्यामध्ये दोन लोक कारमधून बाहेर येत दूतवासाकडे जात असल्याचे दिसून आले. इज्राईलच्या तपासकर्ती टीम शनिवारी तातडीने दिल्लीत पोहचली आहे. त्यांच्या मदतीने या स्फोटासंदर्भात भारतीय एजेंसीची मदत केली जाणार आहे. या घटनेत दिल्लीतील लुटियंस हाय सिक्युरिटी झोन मध्ये काही कार जळून खाक झाल्या आहेत.

ज्या गाडीने दोन लोक दूतवासाकडे आले त्यामधील कारच्या चालकाचा शोध घेतला गेला आहे. या संशयितांचे स्केचिंग तयार केले जात आहेत. स्फोटातील यांचा हात असल्याचे निश्चित करण्यासाठी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी एक पत्र सुद्धा हाती लागले आहे. यामध्ये असे लिहिले होते की, हा स्फोट एक फक्त ट्रेलर आहे. (Minor Blast Near Israel Embassy in Delhi: दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ आयडी स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही)

सुत्रांनी असे म्हटले की, पत्रात इराणचे जनरल कासिम सुलमानी आणि इराणचे वरिष्ठ परमाणू मोहसिन फाखरीजादे यांचा उल्लेख 'शहीद' असा करण्यात आला आहे. गेल्या वर्षात या दोघांची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी हा स्फोट विजय चौकापासून 1.4 किमी अंतरावर झाला. जेथे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अन्य सरकारचे अन्य वरिष्ठ सदस्य बीटिंग र्रिटीटच्या सोहळ्यासाठी जमले होते. राजधानीत विमानतळासह अन्य काही महत्वांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement