Delhi High Court: पतीला अपमानित करणे, नपुंसक म्हणणे क्रूरता: दिल्ली उच्च न्यायालय
दोनदा IFV प्रक्रिया करूनही, जोडप्याला मूल होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वैवाहिक मतभेद निर्माण झाले.
वारंवार घरातल्यांच्या किंवा बाहेरच्या व्यक्तींसमोर पती नपुंसक आहे असे म्हणणे, हे मानसिक क्रूरता आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) म्हटले आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पत्नीने पतीवर क्रूरता केली असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पतीला घटस्फोट (Divorce Case) केला. यानंतर कोर्टाकडून पत्नीच्या वागणूकीवर टिप्पणी करण्यात आली. (हेही वाचा - High Court On Divorce: असाध्य आजार लपवून लग्न, हायकोर्टाकडून घटस्फोट वैध; पीडित पुरुष पतीला दिलासा)
जी पत्नी त्याच्या पतीला उघडपणे अपमानित करते, त्याला नपुंसक म्हणून संबोधते आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्या लैंगिक आयुष्यावर बोलते तिने पतीवर मानसिक क्रूरताच केली असे म्हटले जाऊ शकते," असे न्यायालयाने या प्रकरणी म्हटले. दरम्यान, पत्नीचा स्वभाव चिडचिडा आणि बोलणे वाईट आहे. ती सतत क्षुल्लक गोष्टीवरून भांडत असते. असे कारण देत पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर पतीने याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला.
2011 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला मुल होत नव्हते. दोनदा IFV प्रक्रिया करूनही, जोडप्याला मूल होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वैवाहिक मतभेद निर्माण झाले. मूल होत नसल्याने पत्नी पतीला कुटुंबातील सदस्यांसमोर नपुंसक म्हणायची. असा आरोप पतीने केला आहे. घटस्फोटाला दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.