दिल्ली: सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सराफा बाजारातील आजचे नवे दर

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण झाल्याचे दिसून आल्यानंतर आता पुन्हा दर वाढले आहेत. तर चांदीच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटी यांच्या अनुसार, दिल्ली येथे सोन्याचे दर 71 रुपयांनी वाढले असून आता 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.

Jewellery (Photo Credits: Pixabay)

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण झाल्याचे दिसून आल्यानंतर आता पुन्हा दर वाढले आहेत. तर चांदीच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटी यांच्या अनुसार, दिल्ली येथे सोन्याचे दर 71 रुपयांनी वाढले असून आता 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने भारतीय सोन्याचांदीच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. गुरुवारी चांदीचे दर 359 रुपयांनी वाढले आहेत.

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव 71 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा परिणाम झाल्याने सोने-चांदी दर वाढ झाली आहे. तर बुधवारी सोने 38,493 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्याचसोबत युएस फेडरल रिझर्व्ह यांनी बुधवारी 2020 पर्यंत प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. तर व्याजदरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयामुळेच त्यांच्या किंमतीत वाढ होत आहे.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)

 चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये 359 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदी 44,984 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. यापूर्वी बुधवारी त्याचे दर 44,625 रुपये होते. व्यापाऱ्यांकडून चांदीची विक्री झाल्यानंतर दर वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढत 1437 डॉलर प्रति औंस आणि चांदी 16.84 डॉलर प्रति औंस झाला.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement